Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

विडणी प्रमाणे धुळदेव,पिंपरद,माझेरी गावाचा विकास होईल, - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग

विरोधकांनी तीस पस्तीस वर्षे सत्तेत असताना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत आता कोणत्या तोंडाने तुम्ही मते मागताय केला हल्ला
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -

गेली तीस पस्तीस वर्षे तुमच्याकडे सर्वच सत्ता होत्या परंतु तुम्ही या जनतेचा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत आता कोणत्या तोंडाने तुम्ही मते मागताय असा घणाघात विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केला.

        

धुळदेव कर्णे वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ.सुषमाताई अविनाश मोरे तसेच विडणी पंचायत समितीचे उमेदवार सचिन गजानन अभंग (अध्यक्ष) यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत सागर अभंग बोलत होते यावेळी धुळदेवचे माजी सरपंच माणिकराव अण्णा कर्णे,माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, अविनाश मोरे, दत्तानाना ढमाळ,जालिंदर भिवरकर उपस्थित होते.

      

आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले विरोधकांनी फक्त गावागावात तसेच भावकी भावकीत तसेच भावा भावात भांडणे लावून आपली राजकीय पोळी भाजली तीस पस्तीस वर्षे मूलभूत सुविधा ही देऊ शकले नाहीत आता लोकांसमोर काय व्हिजन घेऊन जायच या द्विधा मनस्थिती मधे असलेले विरोधक यांचं आता राजकारण संपले आहे आता विकास पुरुष असलेले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांना साथ देणारे मंत्री जयकुमार गोरे,तसेच आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे फलटण शहरात सुरू असून तीच विकासकामे करायची असल्याने जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ.सुषमाताई मोरे व सचिन अभंग यांना निवडून द्या अन् त्यांच्या हाताला धरून तुमच्या गावात वाडी वस्तीवर विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी तयार रहा असे सागर अभंग यांनी स्पष्ट केले.

     

तीस पस्तीस वर्षे सत्तेत असलेल्याना लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे हे समजत नाही,विडनी येथे येऊन बघा विकास काय असतो तो माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा उमेदवार सचिन अभंग अध्यक्ष 24×7 गावाच्या विकासासाठी उपलब्ध असतात, अन् त्याच विकासात सर्वात मोठा सहभाग त्यांचा असतो असा उमेदवार पंचायत समिती साठी दिला आहे.

       

आपल्याला जुने लोक किंवा ज्येष्ठ मंडळी सांगतात की आजपर्यंत 200 मीटरचा रस्ता होत न्हवता, किंवा साधा बल्ब गेला तर दोन दोन महिने बसत न्हवता,आता तुम्ही तुमचं मुल्य दाखवून द्या,या दोन्ही उमेदवारांना धुळदेव मधून लीड द्या मग तुमची सर्व कामे करायची माझी जबाबदारी आहे असे सागर अभंग यांनी सांगितले,आता निवडून आले की माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन पाटील मंत्रालयात जाऊन हे दोन्ही उमेदवार तुम्हाला यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतील,गेली तेरा चौदा वर्षे अध्यक्षानी कामे केली आहेत,धुळदेव माझेरी अन् पिंपरद मधील सर्व बॅकलॉग भरून काढणार असा शब्द सागर अभंग यांनी दिला.

     

आपल्या उमेदवारांकडून सर्वसामान्य नागरिकांचा विकास होईल मी तुम्हाला वचन देतो ते पैसे वाटतील जेवण देतील परंतु ते निवडणूक झाली की त्यांची पार्टी अन् उमेदवार गायब होतील असे स्पष्ट केले,विडनी ग्रामपंचायत मध्ये संपूर्ण कारभार पारदर्शक होतो अजिबात माहितीचा अधिकार वापरून पैसे घालवू नका,पाहिजे ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.

       

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विकास पुरुष आहेत,ग्रामीण भागातील सर्व रस्ते सिमेंट चे दिसतील,फलटण शहरातील प्रगती दिसेल तशी प्रगती आपल्याला ग्रामीण भागात सर्व गावे करायची आहेत असे सागर अभंग यांनी सांगितले.  

      

विडणी चा विकास केलाय तसा विकास इतर गणातील गावांचा करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे यांनी सांगितले.

       

ही स्वाभिमानाची निवडणूक आहे, विरोधकांनी कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही, ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांनी करायचा असतो कर्तबगार माणूस निवडून दिला की विडनी सारखं गाव होत,यांनी अकलूज चा खासदार निवडून दिला अन् ते गायब झाले कुठंही ते फलटण तालुक्यात दिसत नाहीत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री जयकुमार गोरे अन् माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील आपल्याला विकासनिधी देतात,200 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे, तो पूर्ण निधी आपल्या ग्रामीण भागातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी होणार आहे - अविनाश मोरे 

 मला भरघोस मतांनी निवडून द्या एका महिन्यात तुमची कामे केली नाहीत तर पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही,मला निवडून दिले की पहिला गुलाल या ऐतिहासिक अशा धुळदेव मध्ये घ्यायला येणार - सचिन अभंग (अध्यक्ष)

     

या कोपरा सभेमध्ये प्रास्ताविक दिलीप शिंदे सर यांनी केले तर आभार चैतन्य कर्णे यांनी मानले यावेळी धुळदेव, कर्णे वस्ती व 23 फाटा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER