फलटण प्रतिनिधी : धैर्य टाईम्स क्राईम वार्ता
जिंतीनाका येथे पोलीसांसमक्ष झोंबाझोंबी करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी तीन तरुणाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २८ रोजी सायंकाऴी ६:३० वाजण्याच्या सुमारास जिंतीनाका फलटण येथे खासदार गुऴाचा चहा या ठिकाणी परेश सुदाकर करचे (वय २३ वर्षे रा साखरवाडी ता फलटण जि.सातारा), लखन विलास करचे (वय २६ वर्षे रा साखरवाडी ता फलटण), आबा बाऴू राणे (वय २३ वर्षे रा पिंपरी ता माऴशिरस जि सोलापूर) यांनी फिर्यादी पोउनि सुनिल शिवाजी काटकर यांच्या समक्ष एकमेंकाच्या अंगावर धावुन जावुन हाताने झोंबाझोंबी करीत असताना आढळून आले तसेच पोलीसांसमक्ष झोंबाझोंबी करुन सार्वजनिक शांततेचा भंग करू लागले म्हणून फिर्यादी पोउनि सुनिल शिवाजी काटकर यांनी तीन जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पो हवा गार्डी हे करीत आहेत.



















