फलटण प्रतिनिधी : 24 एप्रिल, धैर्य टाईम्स
सोनवडी बुद्रुक गावच्या यात्रेची वर्गणी न दिलेल्या लोकांची यादी काढा असे म्हणाले चे कारणावरून दोन जणाना मारहाण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मौजे सोनवडी बुद्रुक तालुका फलटण गावचे हद्दीत दिंनाक २१ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराला फिर्यादी सुरेश भगवान चव्हाण (वय 54 सध्या राहणार सोनवडी बु तालुका फलटण) यांना गावचे यात्रेच्या वर्गणीचा हिशोब संपल्यानंतर गावातील वर्गणी न दिलेल्या लोकांची यादी काढा असे म्हणाले चे कारणावरून पांडुरंग सदाशिव आडके, ऋषिकेश पांडुरंग आडके, मयूर विश्वनाथ आडके अर्जुन महादेव आडके (सर्व राहणार सोनवडी बुद्रुक तालुका फलटण) यांनी फिर्यादी व फिर्यादीच्या भावास मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार खाडे करत आहेत.



















