Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न

उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार रुग्णसेविका नर्सेस व स्टाफ यांच्यावर निलंबिणाची कारवाई करावी : हरीश काकडे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधि : 

 फलटण शहर व तालुक्यातील सर्वसामान्य लोक वैद्यकीय उपचार घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात येथे येत असतात परंतु या ठिकाणी कार्यरत असलेला रुग्णसेविकांचा स्टाफ, वॉर्डबॉय तसेच इतर कर्मचारी बेजबाबदारपणे काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातून ऍडमिट झालेली रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित वागणुक दिली जात नसल्याने अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करुन त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष हरीश काकडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सदरचे निवेदन वैद्यकीय अधिकरी उपजिल्हा रुग्णालय यांना नुकतेच देण्यात आले.

या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, रुग्णालयातील रुग्णसेविका गिरमे यांच्या कडून वृध्द महिला- पुरुषांना एकेरी व अरेरावीची भाषा वापरुन अपमानित केले जात असलेचे पहावयास मिळत, तसेच त्या रुग्णांची सेवा देण्यास असमर्थता दाखवत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण अर्धवट उपचार घेऊन घरी जात आहेत. या सर्व कारणामुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.

उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील लेबोरेटरी मध्ये दुर्लक्ष केल्यामुळे एका रुग्णांची लेबल दुसऱ्यास रुग्णाला लावल्यामुळे तपासणी हानिकारक होत आहे. ज्या रुग्णांना जो आजार झालेलाच नाही अशा रुग्णांना गंभीर आजाराची लागण झालेली असे तपासणी रिपोर्ट येत आहे असल्यामुळे ही ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

त्याचबरोबर एखादया जनावरांना किंवा गुन्हेगारांना क्रूरतेची वागणुक दिली जाते त्या पध्दतीची वागणुक या ठिकाणी रुग्णसेविका (नर्सेस) देत आहेत तर रुग्णालयात स्वच्छता कोणत्याही पध्दतीची दिसत नसुन सर्वत्र घाणीचे साम्राज्य झालेचे निवेदनात म्हटले आहे. प्रसाधन गृहात स्वच्छता नाही, पाण्याची व्यवस्था नाही. त्याचबरोबर चांगल्या प्रतीचे जेवण वेळेवर मिळावे, बेडवर दैनंदिन बेडसिट स्वच्छता नसून ग्रामीण भागातील व शहरातील व तालुक्याच्या बाहेरील रुग्णांना आदराची वागणूक दिली जात नाही. बाहेरील औषधे लिहुन न देता रुग्णालयातच औषधे उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

अस्थिरोगतज्ञ (हाडांचे डॉक्टर) या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात यावे तर दिवस व रात्रपाळीसाठी वेळेत डॉक्टर उपस्थित असावेत. बेजबाबदार नर्सेस वॉर्ड बॉय व स्टाफ हे रुग्णांकडे लक्ष न देता ग्रुप ग्रुपने टवाळके करत, चेष्टा, मस्करी करत, मोबाईल चाळत बसलेले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. अशा बेजबाबदार नर्सेस वर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सामाजिक न्यायच्यावतीने व्रीव आंदोलन छेडले जाईल याची गांर्भीयाने दखल घ्यावी असे शेवटी निवेदनात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER