फलटण प्रतिनिधी -
सुरवडी, ता. फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवडी गावातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, माजी सरपंच जितेंद्र साळुंखे-पाटील, सरपंच सौ. शरयू साळुंखे-पाटील व उपसरपंच सूर्यकांत पवार यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील रस्त्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत फंडातून ४५ लाख रुपये, तर २५:१५ योजनेतून ३० लाख रुपये, असा एकूण ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या निधीतून गावातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
या कामासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे-पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शुभारंभ प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत माने, ग्रामस्थ तसेच कर्मचारी उपस्थित होते. गावातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची वाहतूक अधिक सुलभ होऊन गावाच्या विकासाला चालना मिळणार आहे.













