Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये नेमका फरक काय?

टीम : धैर्य टाईम्स

कोरोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे सध्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन व वैद्यकीय कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. यामध्येच सध्या अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनावरील औषधांसोबतच ऑक्सिजन सिलेंडर, बेडची कमतरता जाणवू लागली आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजनची निर्माण होणारी कमतरता लक्षात घेता आता केंद्र सरकारने 50 हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मेडिकल ऑक्सिजन म्हणजे नेमकं काय असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.
जगण्यासाठी ऑक्सिजन हा अत्यंत गरजेचा आहे. आपल्या अवतीभोवतीदेखील ऑक्सिजन आहे. त्यामुळेच आपण श्‍वास घेऊ शकतो. मात्र, एखादा रुग्ण आजारी असेल तर त्याला स्वतंत्र मेडिकल ऑक्सिजन का दिला जातो? किंवा हवेत ऑक्सिजन असतांनादेखील रुग्णांना स्वतंत्र ऑक्सिजनची गरज का लागते असे अनेक प्रश्‍न नागरिकांना सध्या सतावू लागले आहेत. त्यामुळेच आज मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय ते जाणून घेऊयात.
मेडिकल ऑक्सिजन म्हणजे नेमकं काय?
अति अत्यावश्यक औषधांमध्ये मेडिकल ऑक्सिजनचा समावेश करण्यात आला आहे. 2015 मध्ये कायदेशीररित्या त्याला तशी परवानगीदेखील देण्यात आली आहे. तसंच हेल्थकेअरमधील तीन टप्प्यांसाठी हा गरजेचा असल्याचं म्हटलं आहे. यात प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी असे तीन टप्पे करण्यात आले असून डब्ल्युएचओ त्याला अत्यावश्यक औषध म्हणून मान्यता दिली आहे. मेडिकल ऑक्सिजनमध्ये 98 टक्के शुद्ध ऑक्सिजन असतं. यात धूळ, अन्य वायू किंवा कोणतेही अशुद्ध घटक नसतात.
हवेतील ऑक्सिजन व मेडिकल ऑक्सिजनमध्ये फरक काय?
आपल्या अवतीभोवती असलेल्या हवेत केवळ 21 टक्के ऑक्सिजन असतो. तसंच त्यात अन्य धुलीकण मिसळलेले असतात. त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागल्यास हवेतील सर्वसामान्य ऑक्सिजन त्याला देता येत नाही. तर, मेडिकल ऑक्सिजनसाठी स्वतंत्र प्लांट उभारण्यात आले आहेत. तेथे लिक्विड ऑक्सिजन तयार केला जातो. जो शुद्ध असतो.
मेडिकल ऑक्सिजन कसा तयार केला जातो?
मेडिकल ऑक्सिजन तयार करण्याच्या बॉयलिंग पॉइंट पद्धत वापरली जाते. पाणी 0 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत थंड करुन त्याला गोठवल्यानंतर त्याला 100 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत गरम उकळल्यानंतर ज्या पद्धतीने वाफ म्हणजे गॅस तयार होतो. तसाच काहीसा मेडिकल गॅस तयार केला जातो. ऑक्सिजन 183 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत तापवून त्याचं रुपांतर गॅसमध्ये होतं. म्हणजे थोडक्यात, पाणी गरम होण्यासाटी 100 डिग्री सेल्सिअसचं तापमान लागत असेल. तर, ऑक्सिजनसाठी 183 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची गरज लागते.
मेडिकल ऑक्सिजन तयार करण्याची योग्य पद्धत
हवेतील शुद्ध ऑक्सिजन वेगळा करुन मेडिकल ऑक्सिजन तयार केला जातो. आपल्या आसपासच्या हवेत 78 टक्के नायट्रोजन,21 टक्के ऑक्सिजन आणि बाकी 1 टक्का आर्गन,हिलिअम, नियॉन, क्रेप्टॉन,जीनॉनयासारखे अन्य वायू असतात. या सगळ्या वायूंचं तापमानाचं अंश वेगवेगळं आहे. मात्र, प्रत्येकाचं कमी आहे.
हवेला गोठवून तिचं तापमान 108 अंशी डिग्रीपर्यंत नेलं तर तिचं रुपांतर जीनॉन गॅस लिक्विडमध्ये होतं. या पद्धतीने आपण हवेतून हा गॅस वेगळा करु शकतो. त्याच पद्धतीने -153.2 डिग्रीवर क्रेप्टॉन, -183 ऑक्सिजन आणि अन्य वायू क्रमाक्रमाने वेगळे केले जातात. त्यानंतर त्याचं द्रव्य रुपात साठवण केली जाते. हवेतून गॅसला स्वतंत्र करण्याच्या या प्रक्रियेला क्रायोजेनिक टेक्निक फॉर सेपरेशन ऑफ एअर असं म्हटलं जातं. याच पद्धतीने तयार करण्यात आलेला द्रव्य रुपातील ऑक्सिजन हा 99.5 टक्के शुद्ध असतो. विशेष म्हणजे गॅसचा बॉयलिंग पॉइंट वाढवा यासाठी ही प्रक्रिया प्रचंड दाबावर केली जाते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER