फलटण प्रतिनिधी : ग्रामपंचायत जाधववाडी ता. फलटणचे माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश जाधव, युवा नेते सागर जाधव,किशोर जाधव ,सखाराम जाधव,सुदाम जाधव,संकेत जाधव, प्रेम जाधव, प्रमोद जाधव,श्रीराम जाधव, हर्षद जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष निखिल पवार यांनी माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व युवानेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी उमेश तानवडे,विक्रम सावंत सौरभ सस्ते आदी उपस्थित होते. जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्याने राष्ट्रवादीला पुन्हा दणका बसल्याचे बोलले जात आहे.