फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंदची 57 वी वार्षिक सभा मुंबई येथे 29 सप्टेंबर रोजी आयोजित कारण्यात आली आहे. वार्षिक सभेच्या निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांना निवेदन व वार्षिक अहवाल देताना महानंदा डेअरीला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे साकडे महानंदाचे संचालक डी. के. तथा ज्ञानेश्वर पवार यांनी घातले असल्याचे सांगितले.
महानंदा डेअरी आर्थिक दृष्ट्या खूप अडचणीत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून महानंदाला पुन्हा नवसंजीवनी मिळेल असा आशावाद डी.के. पवार यांनी व्यक्त केला आहे.



















