फलटण प्रतिनिधी : 26 एप्रिल
धैर्य टाईम्स - क्राईम स्पेशल
मौजे विडणी येथील एका महिलेचा चुलत दिर विनयभंग करून महिलेला वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करुन त्रास देत असल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिंनाक २२ रोजी दुपारी १२:४५ वाजण्याचा सुमारास मौजे विडणी ता फलटण गावचे हद्दीत फिर्यादी यांच्या अशोक किराणा नावाच्या दुकानांत फिर्यादी महिलेचा चुलत दिर दिपक बाबुराव जाधव (रा पाटस ता दौंड जि पुणे) याने येवुन फिर्यादी महिलेचा हात धरला व म्हणाला की, तु माझेशी लग्न का केले नाही व तु मला आवडतेस असे म्हणाला व तु माझेशी शारीरिक संबंध ठेव असे म्हणुन फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व नंतर मला म्हणाला की मी तुझ्यासाठी बारामती येथे भाड्याने प्लॅट घेतला आहे तु जर आली नाहीस तर तुझ्या नव-याला जेलमध्ये टाकेन तेव्हा पासुन तो महिलेला वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करुन त्रास देत आहे अशी फिर्याद दिपक बाबुराव जाधव यांचेविरुध्द महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो हवा अडसूळ करत आहेत.


















