Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

सातारा जिल्हा बँकेस देशपातळीवरील ४ सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

टीम : धैर्य टाईम्स
4 Best National Bank Awards for Satara District Bank
बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो.

सातारा : बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये होत असलेले विविध तांत्रिक बदल व चालू घडामोडींचा आढावा घेवून बँकिंग फ्रंटिअर्स मासिकांचे माध्यमातून माहिती बँकांपर्यंत पोहोचविणेचे उल्लेखनिय कामकाज करते.
या संस्थेमार्फत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस प्रमुख करंडकासह ४ सर्वोत्तम पुरस्कार.  “सर्वोत्कृष्ट डिजिटल बँक”, “सर्वोत्कृष्ट एन.पी.ए. व्यवस्थापन”, “सर्वोत्कृष्ट कोविड रिलीफ पॅकेज”, व  “सर्वोत्कृष्ट ऑडीट इनिशिएटिव्ह ” असे चार पुरस्कार खा. डॉ. भागवत कराड यांच्या शुभहस्ते आणि वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कौशिक, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि क्रेडिट सोसायटी लि. दिल्लीचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, बँकिंग फ्रंटिअर्स मुख्य कार्यकारी अधिकारी बाबू नायर, संपादक मनोज अग्रवाल व भरत सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे व विविध विभागांचे अधिकारी यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक व विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे.
बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बँकेने सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. बँकेने राखलेला शुन्य टक्के एन.पी.ए., १००% कर्जवसुली, उत्तम व्यवस्थापन, नाबार्ड व आर.बी.आय.च्या नियमांचे काटेकोर पालन तसेच बँकींग व्यवसायातील विविध रेशो बँकेने राखले आहेत.  बँकेने सी.बी.एस. प्रणाली, मोबाईल बँकिंग, किसान पे अॅप, भिम अॅप ग्राहकांना देवून क्रांती केली आहे.
संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.शामराव उर्फ बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेला उत्कृष्ठ कामकाजाबद्दल नाबार्डचे सलग सहा व इतर संस्थांचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. बँकेचा नावलौकिक संबंध देशात झालेला आहे. आपल्या बँकेने सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे.
यावेळी डॉ. भागवत कराड यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख केला. तसेच बाबू नायर म्हणाले, सातारा जिल्हा बँक सर्वसामान्य ग्राहकांना बँकिंग सेवा व सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात याकरिता बँक ३०७ शाखा व १२ विस्तारीत कक्ष, ५७ एटीएम, ६५० मायक्रो एटीएम आणि मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कृषी सहकारी क्षेत्रात निरंतर कार्य करीत आहे. ग्रामीण विकासाबरोबरच कृषी औद्योगिकरणाचे धोरण बँकेने गतिमान करण्यासाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.
बँकेने सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणालीमध्ये जोडून ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे डिमांड ड्राफ्ट/ आरटीजीएस/ एनईएफटी/ क्लिअरींग मोडयुल, ऐनीव्हेअर बँकिंग, रूपे डेबिट कार्ड, रूपे किसान क्रेडिट कार्ड, तसेच वुमन्स कार्ड, स्टुडंट कार्ड, एस.एम.एस. बँकिंग सुरू करून ग्राहकांना कॅशलेस बँकिंग साठी प्रोत्साहित केले आहे. युपीआय सर्व्हरमुळे फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, ई-कॉमर्स तसेच गुगल पे, फोनपे, पेटीएम, अॅमेझोन या प्रकारचे अॅप्लीकेशनद्वारे मोठ्या प्रमाणात जलद डिजीटल व्यवहार घरबसल्या काही क्षणात करता येणार आहेत. बँकेने व्यावसायिक, दुकानदार, विक्रेते यांचे करिता QR कोड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय कार्याची नोंद घेवून बँकिंग फ्रंटिअर्स या देशपातळीवरील जिल्हा बँक श्रेणीतील “सर्वोत्कृष्ट डिजिटल बँक”, कारीताचा पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना एन.पी.ए चे निकष लागू केलेपासून बँकेने निव्वळ एन.पी.ए. चे प्रमाण सतत १४ वर्षे ‘शून्य’ टक्के राखण्यात बँकेला यश प्राप्त झाले आहे. या बँकेच्या उल्लेखनीय कार्याची नोंद घेवून बँकिंग फ्रंटिअर्स मार्फत देशपातळीवरील जिल्हा बँक श्रेणीतील “सर्वोत्कृष्ट एन.पी.ए. व्यवस्थापन” कारीताचा पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला आहे.
बँकेने बँकींग कामकाजाबरोबर जिल्ह्यातील विकासाभिमुख कामात अग्रेसर राहून कोरोना महामारीच्या काळात जपलेल्या सामाजिक बांधिलकीची  नोंद घेऊन “सर्वोत्कृष्ट कोविड रिलीफ पॅकेज” हा पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला आहे. कोविड-१९ या जागतिक महामारीच्या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रुपये १ कोटी तसेच मा. संचालक मंडळाचा एक दिवसाचा सभा भत्ता व बँक सेवकांचा १ दिवसांचा पगार रुपये १६ लाख तसेच बँकेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून जिल्ह्यातील गरजू कुटुंबाना त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी वाटप करण्यात आले असून यासाठी रक्कम रुपये १ कोटी खर्च केले आहेत. यावर्षीही जिल्हयाच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करणेसाठी रुपये ३.०० कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
स्थापनेपासून बँकेस ऑडीट ‘अ’ वर्ग प्राप्त झालेला असून बँकेच्या मुख्य कार्यालय व शाखांवर बँकेचे असलेले अंतर्गत नियंत्रण व उत्कृष्ट कार्यप्रणालीची दखल घेवून “सर्वोत्कृष्ट ऑडीट इनिशिएटिव्ह ” करीताचा पुरस्कार बँकेस प्रदान करण्यात आला आहे.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या चार पुरस्कारांमुळे बँकेच्या नांवलौकिकामध्ये आणखी भर पडली आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, शुन्य टक्के निव्वळ एन .पी .ए, दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमूख सेवा यामुळे आय.एस.ओ. ९००१-२०१५ मिळालेले मानांकन, सामाजिक बांधिलकी तसेच राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच खुप कमी वेळात आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंगच्या सुविधा देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा अवलंब यामुळे आजपर्यंत महाराष्ट्र शासन, नाबार्ड, नॅफस्कॉब, राज्य बँक, महारास्ट्र स्टेट को. ऑप बँक्स असोसिएशन तसेच देशातील इतर सहकारी संस्थांकडून विविध ९८ पुरस्काराने बँकेस गौरविणेत आले आहे.
या पुरस्काराबद्दल सर्व संचालक सदस्य यांनी अभिनंदन करून  बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे बँकेचे ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार व सभासद यांनी बँकेच्या गुणवत्तापूर्वक यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER