Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

हनी ट्रॅप करून एकाकडून ५० हजार रूपयांची खंडणी, सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल 

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी: हनी ट्रॅप करून एका तरुणाकडून ५० हजार रूपयांची खंडणी वसूल करणाऱ्या सात जणांच्या विरूध्द फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

फलटण शहर पोलिस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ जुलै २०२३ रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास पाचबत्ती चौक फलटण ता. फलटण जि. सातारा येथे साक्षी उर्फ मोनिका किसन मोहिते (रा. पाचबत्ती चौक फलटण मूळ रा. शिंदेवाडी तालुका फलटण जि. सातारा) हिने फिर्यादी तरुणास मला तुला भेटायचं व पाहायचे आहे असे म्हणून भाड्याचे रूमवर बोलून घेऊन त्या ठिकाणी तिचे इतर सहा साथीदार आरोपी यांना फोन करून बोलावून घेऊन त्यांनी तू कुठला आहेस आमच्या बहिणी जवळ काय करतोस असे म्हणून मारहाण करून संशयीत आरोपी ऋषिकेश (पूर्ण नाव माहिती नाही) याने फिर्यादी तरुण यांच्याकडील जबरदस्तीने मोबाईल काढून घेऊन जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून जुने आयटीआय कॉलेजचे जुन्या इमारती जवळ फलटण या ठिकाणी नेऊन दमदाटी व हाताने व दाता बुक्क्यांनी मारहाण करून तुझ्यावर साक्षीला सांगून बलात्काराचा गुन्हा दाखल करतो. जर गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुला दोन लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून फिर्यादी तरुणास धमकावून व्हिडिओ काढून तसेच यातील महिला आरोपीने पोलीस असल्याचे सांगून तू कुणाचे घरात घुसतो तुला केस मध्ये गुंतवते असे म्हणून आरसी बुक काढून घेतले. त्याचे खात्यावर पैसे आहेत ते पैसे पोलिसांचे खात्यावर टाकून घ्या व तो पोलिसांना लाच देतो असे म्हणून यांचेवर आणखी एक गुन्हा दाखल करून घेते. असे म्हणून धमकावून हाताने मारहाण केली आहे. फिर्यादी तरुणास त्यांनी पैशाची मागणी केली तसेच त्याच्याजवळ पैसे नसल्याने मित्राच्या कडून ऑनलाईन पैसे घेऊन ते 50 हजार रुपये एटीएम मधून परस्पर काढून घेतले. 

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात ऋषीकेश प्रल्हाद बोडरे (वय.२३ वर्षे रा. खुंटे ता. फलटण जि सातारा), धिरज अमोल लगाडे (वय १९ वर्षे रा. खुंटे ता. फलटण जि सातारा), प्रतिक विजय भंडलकर (वय १९ वर्षे रा. खुंटे ता. फलटण जि सातारा), सौ. मोनिका ऊर्फ साक्षी किसन मोहिते (वय २३ वर्षे मुळ रा. शिंदेवाडी ता.फलटण जि.सातारा हल्ली रा. पाचचती चौक, फलटण जि.सातारा), सौ. सुहासिनी योगेश अहिवळे (वय.२९ वर्षे मूळ रा. मंगळवार पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा हल्ली रा. बिरदेव नगर, जाधववाडी ता. फलटण जि.सातारा) या पाच जणांना तसेच या गुन्ह्यात सामील असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून वरील पाच संशयीत आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून दोन अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात येणार आहे. 

 

सदर गुन्हयाचा तपास सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक फलटण शहर सुनिल शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक केनेकर, पोलिस उपनिरीक्षक सुरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, पो.ना.सचिन जगताप,पोलिस कॉन्स्टेबल सचिन पाटोळे, महेश जगदाळे, यांनी केला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे करीत आहेत.

फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल शेळके यांनी जाहीर आवाहन केले आहे की, जर अशा प्रकारची घटना कोणा बरोबर घडली असल्यास त्यांनी फलटण शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER