Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न फलटणकर खपवून घेणार नाहीत : श्रीमंत संजीवराजे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण (प्रतिनिधी) : निवडणुका जवळ आल्या की, छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य म. फुले, पुण्यश्लोक

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी प्रेम उफाळुन आल्याने फलटण शहरात त्यांच्या पुतळ्यांची उभारणी करण्याची आवई उठवून त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न फलटणकर खपवून घेणार नाहीत असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

 फलटण शहरात छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले, म. गांधी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारुन त्यांचे विचार, त्यांनी घालून दिलेले आदर्श समाजासमोर विशेषतः तरुणांसमोर ठेवण्यासाठी आम्ही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहोत, त्यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून या सर्व महापुरुषांचे पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळे उभारण्याबाबत नगर परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून नगर परिषदेत त्याबाबत रीतसर ठराव झाले असून सदर सर्व पुतळ्यांच्या ठिकाणी व परिसर सुशोभीकरणाचे ठराव नगर परिषदेने मंजूर केल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

  केवळ सदर ठराव मंजूर करुन आम्ही गप्प बसलो नाही तर महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी शासकीय निधी उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी, नियम, निकष यांची माहिती असल्याने या महापुरुषांच्या स्मारकांसाठी गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या माध्यमातून या महापुरुषांचे पुतळे तयार करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून परिसर सुशोभीकरण कामे काही ठिकाणी सुरु आहेत, काही पूर्णत्वास गेली आहेत, काहींची टेंडर्स निघाली असल्याचे निदर्शनास आणून देत या संपूर्ण प्रक्रियेची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

 आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महापुरुषांचे पुतळे व परिसर सुशोभीकरण प्रक्रिया सुमारे ६/७ वर्षांपासून सुरु आहे. दि. १६ मे २०१६ रोजी फलटण नगर परिषद सर्वसाधारण सभेत छ. शिवाजी महाराज पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा उभारणे, तसेच शहरातील म.गांधी यांचा सध्या असलेला पुतळा जुना व जीर्ण झाल्याने तो बदलणेस आणि म. फुले पुतळा समितीच्या मागणी नुसार म. फुले यांच्या सध्याच्या पुतळ्याच्या जागी नवीन पूर्णाकृती पुतळा उभारणीस मान्यता देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

फलटण नगर परिषद तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दि. ३० एप्रिल २०२१ च्या पत्रा नुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य म. फुले उत्सव समिती सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी वरील दोन्ही महामानवांचे शहरात असलेले पुतळ्यांचे जागी पूर्णाकृती पुतळे उभारणे व परिसर सुशोभीकरण करणेस केलेल्या मागणीस नगर परिषद सर्वसाधारण सभा दि. २३ एप्रिल २०२१ च्या सभेत मान्यता देण्यात आल्याचे कळविले आहे.

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य म. फुले यांचे शहरातील अर्ध पुतळ्यांच्या जागी पूर्णाकृती पुतळे उभारणे कामी पुतळा समिती अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मागणीनुसार दि. २६ एप्रिल २०२१ च्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली असून सदर दोन्ही पुतळे समितीने तयार करुन घेऊन उभारणीस परवानगी मागितल्याचे या ठरावात नमूद आहे.

 महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार वैशिष्टयपूर्ण योजनेंतर्गत नगर परिषदांना निधी वितरीत करण्यात आला, त्यामध्ये फलटण नगर परिषदेस १० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये श्रीमंत मालोजीराजे पुतळा ते म. फुले पुतळा चौक रस्ता विकसित करणे व डेकोरेटिव्ह पोल उभारणे कामी ६३ लाख रुपये, छ. शिवाजी महाराज चौक परिसर विकसित करणे ६० लाख रुपये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर विकसित करणे ६० लाख रुपये, म. गांधी चौक (गजानन चौक) ते बादशाही मस्जिद रस्ता विकसित करणे १ कोटी रुपये उपलब्ध झाले असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

 एकूणच शहरातील महापुरुषांचे पुतळे पूर्णाकृती करणे, परिसर सुशोभित करणे व त्या परिसरातील रस्ते, बाजूचे वीज खांब डेकोरेटिव्ह उभारणे ही प्रक्रिया सुरु असून त्यास नगर परिषद आवश्यक मान्यता आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन घेण्याची प्रक्रिया आणि सदर कामे प्रत्यक्ष सुरु असताना केवळ श्रेय घेण्यासाठी स्थानिक विकास निधीतून निधीच्या तरतुदींचे पत्र देवून आपण हे पुतळे उभारणी करीत असल्याचे दाखविणे अयोग्य व या शहराच्या सर्वांगीण विकासात सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहण्याच्या परंपरांना खंडित करणारे असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास यांचाच विरोध

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीस नगर परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊन शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सदर पुतळा उभारणी बाबत ठराव मांडून पुतळा स्वतः देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेविका सौ. वैशाली कृष्णाथ चोरमले यांनी मांडला, मात्र विरोधी पक्षाने उपसूचना मांडून सदर प्रक्रिया थांबविण्याचे काम केल्याचे कृष्णाथ तथा दादासाहेब चोरमले यांनी सांगितले.

    वास्तविक प्रचलित नियम निकष पाहता नगर परिषद महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ शकत नसल्याचे माहित असूनही उपसुचनेद्वारे विरोध करुन नगर परिषदेने सदर पुतळा उभारण्याची उपसूचना मांडून पुण्यश्लोक राजमाता यांच्या पुतळ्यास यांनीच विरोध केल्याचे दादासाहेब चोरमले यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER