Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

जागतिक पातळीवरील शैक्षणिक उंची गाठण्यासाठी मुंबई विद्यापीठाने वाटचाल करावी - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

विद्यापीठाच्या चार शैक्षणिक इमारतींचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
टीम : धैर्य टाईम्स
जागतिक पातळीवर होणारे शैक्षणिक बदल यावर संशोधन करून भारताने वाटचाल करावी.भारतामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच येथील संस्कृतीचे वेगळेपण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अनेक देशांनी  मान्य केला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

 मुंबई, दि. 8 : जागतिक पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून शैक्षणिक उंची गाठण्यासाठी वाटचाल करण्याचा दृढ निश्चय मुंबई विद्यापीठाने केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन, ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत) मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह या चार इमारतींचे  उदघाटन  राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू  प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील  उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, जागतिक पातळीवर होणारे शैक्षणिक बदल यावर संशोधन करून भारताने वाटचाल करावी.भारतामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच येथील संस्कृतीचे वेगळेपण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अनेक देशांनी  मान्य केला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

विद्यापीठामध्ये कार्य करताना अडचणी आणि तक्रारी याकडे लक्ष न देता विद्यापीठासाठी आपण काय करतोय आणि विद्यापीठ आपल्याला काय देते याचा आपण विचार करून कार्य केले तर यश नक्कीच मिळेल, असेही राज्यपालांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठामध्ये अनेक नामवंत विद्यार्थी तयार झाले आहेत. विद्यापिठाचे नामवंत विद्यार्थी नोबेल पुरस्कारापर्यत पोहोचले पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी सर्वांनी कार्य करावे असेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

 कुलगुरू श्री.पेडणेकर म्हणाले, विद्यापीठासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन, ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत) मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह या चार इमारतींचे  उदघाटन करण्यात आले. भविष्यातील डिजिटल ग्रंथालयाचा अभ्यास करून अद्ययावत अशी ग्रंथालयाची इमारत उभारण्यात आली आहे. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठीही नवीन वसतीगृह इमारत बांधण्यात आली आहेत.

मुंबई विद्यापीठाची व्याप्ती मोठी असूनही सात जिल्ह्यांमध्ये आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोविडमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न  आणि दुसऱ्या बाजूला परीक्षा वेळेत घेणे, निकाल वेळेत जाहीर करणे  हे एक मोठे आव्हान विद्यापीठांसमोर होते. या काळात प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले म्हणून हे शक्य झाले. जागतिक पातळीवरील शैक्षणिक बदल आणि काळाची गरज लक्षात घेऊन  विद्यापीठांची शैक्षणिक वाटचाल झाली पाहिजे असेही श्री. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन

ही इमारत परीक्षा विभागासाठी बांधण्यात आली असून सात मजल्याची आहे.  या इमारतीमध्ये कुलगुरू, प्र. कुलगुरू, संचालक यांचे कार्यालय असून परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये असणार आहेत.

ज्ञानस्रोत केंद्र, ग्रंथालय भवन

तळमजल्यासह दोन मजल्याची ही इमारत ग्रंथालयासाठी बांधण्यात आली आहे. पर्यावरण पूरक खेळती हवा असणारी अशी ही इको फ्रेंडली इमारत बांधण्यात आलेली आहे. हे ग्रंथालय भविष्यात डिजिटल ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल.

मुलींचे वसतिगृह

विद्यानगरी परिसरात सात मजल्याचे मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात आले असून यामध्ये 72 खोल्या आहेत यात 144 विद्यार्थिनींची व्यवस्था केली जाणार आहे. या वसतिगृहात बहुउद्देशीय हॉल, ग्रंथालय, व्यायामशाळा, लॉन्ड्री, कॅन्टीन, टिव्ही रूम आदी सुविधा असतील.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह

सहा मजली या वसतिगृहात एकूण 85 खोल्या असून यामध्ये 146 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.  या वसतिगृहात बहुउद्देशीय हॉल, ग्रंथालय, व्यायामशाळा, लॉन्ड्री, कॅन्टीन, टिव्ही रूम आदी सुविधा असतील.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER