फलटण | धैर्य टाईम्स |
माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते - पाटील यांनी फलटण नगर पालिकेचे माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्या फलटण येथील बुद्ध या निवासस्थानी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी युवा उद्योजक संग्राम अहिवळे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी नगरसेवक सनी अहिवळे, संग्राम अहिवळे यांच्याबरोबर विविध विषयावर चर्चा केली. येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते.