Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

फलटण तहसील कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी:- तहसील कार्यालय फलटण अंतर्गत तहसीलदार अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार लिपिक व अव्वल लिपिक निलेश भोसले, लिपिक प्रशांत शिंदे यांच्यावर कारवाई करणेबाबत व रेकॉर्ड विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदन दिले आहे. सदर निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसील कार्यालयात होणाऱ्या बेकायदेशीर कामाची पोलखोल केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, फलटण तालुक्यातील शेती महामंडळ वर्ग २ जमिनी वर्ग १ करण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी शासनाने आदेश काढले असून तहसील कार्यालय फलटण येथील महसूल अव्वल कारकून निलेश भोसले याने ऋषी भोसले सांगवी कोतवाल व साखरवाडी येथील तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचारी शाम भोसले यांना हाताशी धरून शेतक-याना २० हजार ते २५ हजार रुपये प्रति एकरी मागणी करत आहेत. निलेश भोसले व शाम भोसले यांनी शेतकऱ्यांना विविध कामातून आर्थिक पैशाची मागणी करत शेतकऱ्यांना विनाकरण त्रास देत मोठी बेहिशोबी मालमत्ता कमवली आहे. जे शेतकरी शेती महामंडळाचे प्रकरणे थेट तहसील कार्यालयात जमा करतात त्यांना निलेश भोसले अडवणूक करत सतत विविध कारणे देत शेतकऱ्यांना त्रास देत आहे. शेती महामंडळाच्या जमिनी वर्ग १ साठी दाखल झालेल्या सर्व प्रकरणाच्या अर्जदार शेतकरी यांच्याकडून कोणी कोणी व किती पैसे मागणी करून स्वीकारले. कोणत्या वरिष्ट अधिका-याना आर्थिक हिस्सा मिळाला याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना महसूल विभागाने चौकशी करावी. महसूल अव्वल कारकून निलेश भोसले व साखरवाडी येथील तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचारी शाम भोसले यानी सेवा कालावधीत पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अपसंपदा कमवली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम २०१८ कलम १३(१) (ई) सह १३ (२) नुसार चौकशी करुण कारवाई करावी.

 तहसील कार्यालयातील विविध विभागातील सर्व लिपिक व अव्वल लिपिक यांनी तहसीलदार अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार यांना हाताशी धरून अनेक खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली खाजगी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली कोणाच्या परवानगीने केली त्यांना पगार कोण, किती व कुठून दिला जातो याची चौकशी करावी. नेमणूक करणाऱ्या विविध विभागातील लिपिक व अव्वल लिपिक यांची तसेच तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यावर चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तत्काळ तहसील कार्यालयात काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना काढण्यात यावे. निलेश भोसले अव्वल लिपिक, प्रशांत शिंदे लिपिक याचा सहभाग असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे असे म्हंटले आहे.

फलटण तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयातील कोतवाल याना नेमून दिलेल्या कामात परस्पर बदल करून रींकेश खराडे, तडवळे कोतवाल, ऋषी भोसले सांगवी कोतवाल, विजय एकळ दूधेबावी कोतवाल, श्रधा ढावरे पाडेगाव कोतवाल, गुरव मुंजवडी कोतवाल, गोरे निरगुडी कोतवाल, गोपी जगताप फडतरवाडी कोतवाल, भीमराव चव्हाण राजुरी निवृत्त कोतवाल, सागर काकडे खाजगी कर्मचारी यांची नेमणूक फलटण तहसील कार्यालयातील रेकॉर्ड विभागात करण्यात आली असून त्यांना रेकॉर्ड विभागातील काम देण्यात आले आहे. रेकॉर्ड विभागात काम करणा-या कोतवाल व खाजगी कर्मचारी यांनी अनेक अर्जदार यांच्याकडून फोन पे व गूगल पे ने बेकायदेशीर रक्कम स्वीकारले असून रेकॉर्ड विभागात काम करणा-या कोतवाल व खाजगी कर्मचारी यांचे बैंक खाते तसेच फोन पे व गूगल पे लाच लुचपत विभाग यांनी तपासणी करावी अवेध रक्कम स्विकारल्या प्रकरणी कारवाई करावी. सर्व शासकीय कोतवालांना त्यांच्या नेमणुकीच्या तलाठी कार्यालयात रुजू करण्याचे आदेश व्हावे कोतवाल नेमणूक प्रकरणी तत्काळ चौकशी करण्यात यावी. सेवा कालावधीत पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अपसंपदा कमवत्नी असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १३(१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम २०१८ कलम १३(१) (ई) सह १३ (२) नुसार चौकशी करुण कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा क्रमांक-मह / कु. का/वतन/कवि-१००९/२०२१ दिनांक २३/११/२०२१ उपजिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश देऊनही तहसीलदार कार्यालय फलटण येथील कोतवाल यांना मुक्त करण्यात आले नाही. उपजिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी जबाबदार तहसीलदार अभिजित जाधव यांच्यावर कारवाई करण्यात यावी असेही म्हंटले आहे.

 फलटण तालुक्यातील अनेक तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात शासकीय कोतवाल असताना अनेक खाजगी कर्मचारी कोतवाल म्हणून काम करत असून संगणक काम करणे, सातबारा देणे, दाखला देणे ही कामे खाजगी कर्मचारी कोतवाल करत आहेत यापुढे फलटण तालुक्यातील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात खाजगी कर्मचारी कोतवाल काम करताना आढळून आल्यास संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी शेतकऱ्याकडून खाजगी कर्मचारी कोतवाल आर्थिक पिळवणूक होत आहे. 

फलटण तालुक्यातील तहसील कार्यालयातील रेकॉर्ड विभागातील सर्व शासकीय जुने महसुल अभिलेख महाराष्ट्र शासनाकडून स्कॅन करून संगणकृत करण्यात आले आहेत. तसेच याबाबत संगणक व प्रिंटर इतर साहित्य शासनाकडून तहसील कार्यालय फलटण यांना देण्यात आले आहे रेकॉर्ड विभागातील सर्व जुनी स्कॅन केलेल्या अभिलेख हे शेतकऱ्यांनी नक्कल मागणी अर्ज दिल्यास त्यांना संगणकृत स्वरूपात देण्याचे शासनाच्या सुचना व आदेश असताना गेल्या अनेक वर्षापासून वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार व नायब तहसीलदार लिपिक व अव्वल लिपिक यांना हाताशी धरून या ठिकाणी खाजगी कोतवाल (खाजगी इसम) व शासकीय कोतवाल अभिलेखाचा शोध घेऊन छायांकित स्वरूपात शेतकऱ्यांना नक्कल पुरवत आहेत. याबाबत शेतकऱ्यांना पावती दिली जात नाही तसेच पावतीवर पोहोच घेतली जात नाही. आज अखेर आणि अनेक वर्ष संगणीकृत सातबारा स्कॅन केल्यापासून कोट्यावधीचा आर्थिक घोटाळा झाला आहे. अर्ज मुख्य आवक जावक नोंदवहीत न नोंदवता थेट रेकॉर्ड विभागात स्वीकारले जातात अनेक अर्जात मागणी असणारी नक्कल छायांकित स्वरूपात नक्कल देऊन हजारो रुपये घेऊन संबंधीत शेतकऱ्यांना पावती न देता तसेच सदर रकमेचा भरणा शासकीय तिजोरीत न करता कोट्यावधीचा रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला आहे रेकॉर्ड विभागात छायांकित नकला देताना छायांकित प्रति करता खर्च कुठून होता केला जातो अशी सर्व चौकशी व्हावी. नक्कल अर्ज आवक-जावक मुख्यनोंद वहित नोदवले का जात नाहित, तत्काळ छायांकित नकला देणे बंद करण्यात यावे यापुढे फक्त संगणकृत स्कॅन केलेले नकला द्याव्यात. मुख्य आवक जावक विभागात नक्कल अर्ज स्वीकारण्यात यावेत. शेतकऱ्यांकडून नक्कल मिळाल्याची पावतीवर पोहोच घ्यावी. तसेच आजखेर कोणी कोणी किती रुपयांचा भ्रष्टाचार केला याची सविस्तर चौकशी व्हावी. या अनुषंगाने सेवा कालावधीत पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अपसंपदा कमवली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक सुधारित अधिनियम २०१८ कलम १३ (१) (ई) सह १३ (२) नुसार चौकशी करुण कारवाई करावी अन्यथा १५ ऑगस्ट २०२४ रोजी आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला आहे. यावेळी धनंजय महामुलकर सातारा जिल्हाध्यक्ष, प्रमोद गाडे राज्य प्रवक्ते, नितीन यादव अध्यक्ष फलटण तालुका, डॉक्टर रवींद्र घाडगे जिल्हा सरचिटणीस, किसन शिंदे, सागर गोडसे उपस्थीत होते.या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभाग पुणे, जिल्हाधिकारी यांना सादर केल्या आहेत.सदर प्रकरणी महसूल विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी खाजगी कोतवाल नियुक्ती, तहसील कार्यालयातील खाजगी कर्मचारी नियुक्ती, रेकॉर्ड विभागातील भ्रष्टाचार,शेती महामंडळाच्या जमिनीच्या वर्ग १ ची परवानगीतील भ्रष्टाचार याबाबत आक्रमक पवित्रा घेतला असल्याने तालुक्यातून मोठया प्रमाणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER