Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

विकास कामे पहाता काही लोकांना पोटदुखी - समशेरसिंह नाईक निंबाळकर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : विविध समाजाच्या जयंतीचे अध्यक्ष पद मागून घेण्याबरोबर विविध समजाच्या थोर पुरुषांच्या पुतळा उभारणीसाठी पुढे यावे. समाज्यामध्ये व जाती जातीत भांडणे लावणाऱ्यांना तालुक्यात व शहरात होऊ घातलेल्या विकास कामे पहाता काही लोकांना पोटदुखी होत आहे असा आरोप नावं न घेता नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला आहे.

वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून फलटण शहरात विविध कामे मंजूर करण्यात आली असून याबाबत आरोप प्रत्यारोप होत आहेत या पार्श्वभूमीवर

नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी याबाबत बोलताना पुढे सांगीतले की, खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून फलटण नगर परिषदेचे विविध भागातील ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी ५० लाख रुपये व पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा अर्धपुतळा बसवण्यासाठी २० लाख रुपये व ईतर विविध कामांना मिळून ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी नगर विकास विभाग यांनी याबाबत शासन निर्णय जाहीर केला आहे.तसेच महात्मा जोतिबा फुले पुतळा सुशोभिकरण करण्यासाठी खासदार फंड १५ लाख रुपये,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी खासदार फंड मधून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत हे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

फलटण शहरातील मुख्य विविध पुतळ्यांना निधी मंजूर झाला असून यानिमित्ताने सर्व समाजातील समाज बांधव यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे नुसतेच कागदावर ठराव व कामे मंजुर करत कागद नाचवण्या ऐवजी पत्यक्षात का विकास कामे करण्यात आली नाहीत याचा खुलासा करावा. अनेक वर्ष नगर परिषदेत सत्ता असतानाही शहरातील एकाही पुतळ्यांचा पूर्ण विकास न करणाऱ्यांनी विकासाची भाषा करू नये. शहरात ठराविक पुतळ्याचा विकास करत काही पुतळे विकसित न करणे तसेच नव्याने न उभारणे यामागे विकृत राजकीय मानसिकता असणाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल करू नये. विविध समाजाच्या थोर पुरुषाच्या जयंतीची मागून अध्यक्ष पद घेऊन पावत्या गोळा करण्याऐवजी विविध समाजाच्या थोर पुरुषांचे पुतळे कसे विकसित केले जातील हे बघायला हवे होते.

रस्त्यावर अतिक्रमण करून बंगल्यास कंपाऊंड कोणत्या निधीतून केले याचा खुलासापण करावा शहरातील खुल्या जागेचे आरक्षण उठवून भूखंड बळकवणाऱ्यांनी शहरातील विकासावर न बोललेले बरे अनेक वर्ष आमदारकी तसेच जिल्हा परीषद अध्यक्ष पद याचबरोबर नगर परिषदेत सत्ता असतानाही छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य म. फुले, पुण्यश्लोक

राजमाता अहिल्यादेवी होळकर या थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विकासकामे का केली नाहीत यावर त्यांनी बोलावे.आम्ही ठराविक पुतळ्याचा विकास न करता चारही पुतळ्यांच्या विकास कामाची मंजुरी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी घेतली असून छ. शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यांची विकास कामे वैशिष्ट्य पूर्ण योजनेतून तर क्रांतीसुर्य म. फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांची विकासकामे खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या खासदार फंडातून मंजूर केली आहेत.

हडको कॉलनी भुखंड मधील ओपन प्लॉट व रस्ता यावर अतिक्रमण करणाऱ्या जवळच्या कार्यकर्त्याची अतिक्रमणे विकास कामात आडवी येताना नेते मंडळींनी दिसत नाहीत का? जनतेने आम्हाला दिलेली संधी आम्ही आमच्या विकास कामातून दाखवून देणार आहोत.आम्हाला कोणत्याही ठेकेदाराची घरी भरण्यासाठी तसेच ठेकेदार कंपनीत शेअर होल्डर व्हायचे नाही. गजानन चौक येथील महात्मा गांधी यांचा जो पुतळा उभा करण्यात आला आहे त्या थोर पुरुषांच्या विकास कामात पैसे खाणाऱ्यांनी मूर्तिकराला किती पैसे दिले, निम्मेच पैसे देऊन पुतळा बसवला आहे हा संशोधनाचा भाग आहे. जनतेला दिलेल्या आश्वासने पूर्ण करण्यासाठी विकास कामे करायची आहेत. आम्हाला कोणत्याही समाजाच्या जयंतीची अध्यक्ष पदे नको आहेत आम्हाला विविध समाजाच्या त्या त्या थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विकासकामे करायची आहेत. जी कामे इतक्या वर्षात झाली नाहीत ती कामे आम्ही पाच वर्षात करून दाखवली आहेत. जनतेने जातीयवादी लोकांना थारा देऊ नये असे यावेळी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER