Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

माऊलींचा स्वागतासाठी फलटण नगरी सज्ज

टीम : धैर्य टाईम्स
यावर्षी फलटणला माऊलींचे दोन मुक्काम
दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर येत असलेल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणकर आतुर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यावर निर्बंध आले होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने पालखी सोहळ्याचे उत्साहात पंढरीकडे प्रस्थान झाले आहे.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि . १ व २ जुलै रोजी फलटण शहरात दोन दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे . वारकऱ्यांच्या व पालखी सोहळ्याच्या नियोजनाची फलटण नगरपरिषद व प्रशासनाने जय्यत तयारी केली असून स्वागतासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी, व आरोग्य सेवा देण्यासाठी नगरपालिका अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले असून संपूर्ण विमानतळ परिसर स्वच्छ केला आहे.

दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर येत असलेल्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटणकर आतुर झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गेली दोन वर्षे माऊलींच्या पालखी सोहळ्यावर निर्बंध आले होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने पालखी सोहळ्याचे उत्साहात पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले प्रमाणे नियम पाळण्यात यावेत, असे आवाहन फलटण पालिकेने केले आहे.

फलटण शहर उपविभागाकडून पालखी मुक्काम काळामध्ये विद्युत पुरवठा अखंडीत राहण्यासाठी तसेच कोणताही अपघात होऊ नये म्हणून विविध कामे प्राधान्याने करण्यात आली आहेत. उच्चदाब व लघुदाब वाहीनीस अडथळा करणाऱ्या विविध ठिकाणच्या झाडांच्या फांद्या काढण्यात आल्या आहेत. सर्वच रोहित्रांचे बॉक्स दुरुस्त करण्यात आले आहेत. पालखी मुक्कामाच्या दिवशी वारकऱ्यांना मोफत तात्पुरत्या  स्वरूपात विज जोडणी देण्यासाठी पोलवरतीच स्विच बोर्ड, जनसेट बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळ येथे माऊली मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची विज जोडणी देण्यात आली आहे. विद्युत सुरक्षिततेच्या कारणास्तव पालखी ज्या मार्गाने येणार आहे त्या मार्गावर विविध ठिकाणी सुरक्षा फलक देखील लावण्यात आले आहेत. पालखी मुक्कामा दिवशी पुर्णवेळ ११० कर्मचारी व १० अभियंते यांची नेमणूक भरारी पथकामध्ये करण्यात आली आहे

या कालावधीमध्ये सिंगल युज प्लास्टिकला बंदी असून कोणीही प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे. नगरपालिकेकडून तब्बल एक हजार मोबाईल टॉयलेट, १ हजार शोष खड्डे शौचालय, महिलांना स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, पालखी मार्गवारील असलेल्या साईड पट्ट्या भरण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरात अगोदरच एक दिवस फॉगिंग केले जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आठ पॉईंट उपलब्ध आहेत. तसेच मुधोजी कॉलेज , यशवंतराव चव्हाण हायस्कूल , मलठण येथे मोठ्या प्रमाणात वारकरी मुक्कामी असतात तिथे प्रत्येकी १०० टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे . याचबरोबर खजिना हौद , पचवत्ती चौक येथे मदत केंद्र उभारली जाणार आहेत. तसेच सर्वच शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून गैरप्रकारांना आळा घातला जाणार आहे. 

रस्त्यात किंवा शहरात कुठेही वारकऱ्यांच्या वाहनांचा घोटाळा झाल्यास क्रेन व पाच मेकॅनिक नेमले आहेत. त्यांच्याद्वारे वाहनांची मोफत दुरुस्ती केली जाणार आहे. पुणे महापालिका व फलटण नगरपालिका यांच्या दोन अॅम्बुलन्स , दोन अग्निशामक , दोन रेस्क्यू टीम मागवण्यात आल्या आहेत . तसेच बाहेरून आलेल्या अधिकारी , कर्मचारी यांना सांस्कृतिक भवन व त्या पाठीमागे असणाऱ्या नवीन इमारतीमध्ये राहण्याची सोय केली आहे . पिण्याच्या पाण्याचा तब्बल तीस दिवस पुरेल एवढा साठा आहे. फलटण नगरपरिषद व सर्वच प्रशासनाने पालखी सोहळ्या बरोबर आलेल्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी सज्ज झाले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER