Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

आयटीआय च्या समस्या मार्गी लावणार : खा. उदयनराजे भोसले

टीम : धैर्य टाईम्स
To solve the problem of ITI: Udayanraje Bhosle
सातारच्या आयटीआयच्या क्रीडांगणाचा योग्य विकास, आयटीआय प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, विद्यार्थी व प्रशासनाच्या विविध समस्या, इत्यादी बाबत दीपावलीनंतर तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, इ. विभागांची संयुक्‍त बैठक घेवून या समस्या मार्गी लावल्या जातील, असे आश्‍वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.

सातारा : साताऱ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था एक नावाजलेली, जुनी आणि आदर्श शासकीय संस्था आहे. याठिकाणाहुन विविध कोर्सेस पूर्ण करुन, अनेकांना समृध्द जीवनाचा मार्ग लाभलेला आहे. जशी मुंबई कोणाला उपाशी राहु देत नाही अशी ख्यातकिर्ती आहे, तसे औद्योगिक तंत्र शिक्षण कोणाला उपाशी राहु देत नाही. आयटीआयच्या कोर्सेसना मोठे महत्व आहे. काळानुरुन येथे नवीन प्रशिक्षण वर्ग देखिल चालवले जात आहेत. सातारच्या आयटीआयच्या क्रीडांगणाचा योग्य विकास, आयटीआय प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, विद्यार्थी व प्रशासनाच्या विविध समस्या, इत्यादी बाबत दीपावलीनंतर तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, इ. विभागांची संयुक्‍त बैठक घेवून या समस्या मार्गी लावल्या जातील, असे आश्‍वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला सदिच्दा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. प्राचार्य एस्‌.एम्‌.धुमाळ, उपप्राचार्य एस.एम.मांगलेकर, सहा.अँप्रॅन्टीस अँडव्हाझर एम.के.उपाध्ये, अँड.डि.जी.बनकर, प्रमुख उपस्थित होते.
सातारची इन्डस्ट्रीयल ट्रेनिंग इंन्स्टीटयुट मोळाचा ओढा परिसरात विस्तीर्ण जागेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत आहे, असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे सांगीतले की, याठिकाणी डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, इलेक्ट्रीशयन, हार्डवेअर-सॉफटवेअर प्रोग्रामिंग, प्लंबर, जोडारी, वायरमन, मशिनिस्ट, इत्यादी महत्वपूर्ण कोर्सेस अनेक वर्षापासून चालत आहेत. कालानुरुप कोर्सेसमध्ये देखिल योग्य ते बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आयटीआय प्रमाणपत्र धारकांस रोजगाराच्या निश्‍चित अशी संधी उपलब्ध आहे. काही वेळा टायमिंग जुळत नाही म्हणून काहींना लवकर संधी मिळत नाही. यापुढे अश्या प्रशिक्षणाथींना रोजगाराची संधी वेळेत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संबंधीत कंपन्यांचे कॅम्पस्‌ आयोजित करुन, रोजगाराची अधिकाधिक संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आयटीआय विद्यार्थी आणि प्रशासनाच्या काही समस्या आहेत, येथील क्रीडा मैदानास योग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, प्रशिक्षणाथींना त्याचा निश्‍चितच लाभ होणार आहे. स्टॅन्ड ते आयटीआय अशी बस सेवा सध्या उपलब्ध नसल्याचे काही महिला प्रशिक्षणांथींनी सांगीतले आहे. या अश्या अनेक समस्यांबाबत संबंधीतांना सूचना दिल्या जातील, आवश्यकते प्रमाणे संयुक्त बैठक दीपावलीनंतर घेतली जाईल आणि आयटीआयच्या उर्जितावस्थेकरीता सर्व ते प्रयत्न केले जातील. संस्थेच्या पायाभुत सुविधा अधिकाधिक विकसित झाल्या तर अश्या संस्थेतील प्रशिक्षणार्थींची चौफेर प्रगती साध्य होण्यास सुलभ होत असते याच हेतुने याकामी जरुर त्या उपाययोजना करण्यात येतील, असे ही खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी, आयटीआयचे प्राचार्य एस्‌.एम्‌.धुमाळ यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे प्रशिक्षणाथीं आणि प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.
शिंदे यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्‍त केले, यावेळी सुतार यांनी स्वतः व प्रशिक्षणार्थी यांनी मिळुन तयार केलेला स्कील इंडियाचा लोगो खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रदान केला. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशिक्षणाथींनी मनमोकळा संवाद साधुन, हितगुज केले.
यावेळी संस्थेतील निकम, गोसावी, महानावर, श्रीमती जोगाईकर, बोराटे इ. गटनिर्देशक व कर्मचारी आणि बहुसंख्य प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. दरम्यान, सातारच्या आयटीआयला खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट दिल्याने, संस्थेचा सेवकवर्ग आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER