Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

पोट कमी करण्यासाठी अप्पर व्यायाम

टीम : धैर्य टाईम्स

काही जणींना एरोबिक व्यायाम करतांना म्हणजे चालताना, धावताना, जिना चढताना, सायकल चालवताना अपर बॉडीसाठीचा व्यायाम करायचा नसतो किंवा करणं शक्य नसतं. मात्र एरोबिक व्यायाम करून झाल्यानंतर अपर बॉडी एक्सरसाइजसाठी काही वेळ राखून ठेवणं फार आवश्यक असतं. झाला आपला व्यायाम, एवढं चालून आलो, धावलो आता काय वेगळा व्यायाम करायचा असं मनात आणू नका. अप्पर बॉडी व्यायामही आवश्यक असतात.
पण त्यात व्यायाम कुठले करायचे? ते समजण्यासाठी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की अपर बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या भागाचा व्यायाम करणं गरजेचं असतं?
अपर बॉडी म्हणजे मुख्यतः हात, खांदे, पाठ, मान, पोट आणि कंबर. आता या सगळ्या अवयवांना, त्यातल्या स्नायूंना व्यायाम देणं खरं म्हणजे फार आवश्यक असतं. तो कसा द्यायचा? तर या सगळ्या अवयवांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. हात आणि खांदे एका भागात तर पोट आणि कंबर. मान आणि पाठ दोन्हीकडे असतात. सामान्यतः रोज एका भागाचा व्यायाम करावा आणि दुसर्‍या दिवशी दुसर्‍या भागाचा. म्हणजेच आलटून पालटून व्यायाम करावेत. स्नायूंना एक दिवस व्यायाम आणि दुसर्‍या दिवशी तुलनेने आराम. अर्थात तो आराम फक्त तुलनेने म्हणता येईल एवढाच असतो. कारण हाताचे व्यायाम करतांना काही प्रमाणात का असेना पोटाचे स्नायू काम करतच असतात. पण अर्थात तसे तर चालतांना आणि धावतांनाही पोटाचे आणि पाठीचे स्नायू व्यायाम करतच असतात. पण तरीही रोज एका भागाचा फोकस्ड व्यायाम करावा. 
हात आणि खांदे यासाठी कुठला व्यायाम करता येऊ शकतो? तर जोर मारणं किंवा डिप्स किंवा पुशअप्स मारणं. अर्थात त्यासाठी मुळात हातात आणि खांद्यात बर्‍यापैकी ताकद लागते. ती नसेल तर तर चक्क भिंतीपासून दोन फूट अंतरावर उभं रहायचं, भिंतीवर हात टेकायचे आणि भिंतीवर पुशअप्स काढायच्या. हा व्यायाम तुलनेने खूप हलका असतो. अगदी नवीन व्यायाम करणार्‍यांनाही जमू शकतो. भिंतीपासून जितकं जवळ उभं राहू तितका हा व्यायाम अजून सोपा होत जातो. जितकं लांब जाऊ तितकी ताकद जास्त लावायला लागते. प्रत्येकीने आपापल्या ताकदीचा अंदाज घेऊन हे अंतर ठरवावं. त्याखेरीज व्यायामशाळेत करण्याचे अनेक व्यायाम आहेत. वजन घेऊन बायसेप्स, म्हणजे दंडाच्या पुढच्या स्नायूचा व्यायाम करता येतो. गुढग्यावर खाली बसून, वजन घेऊन कोपरापासून मनगटापर्यंतचा हात स्टूलवर ठेऊन फक्त मनगट वळवून कर्लिंग्ज मारता येतात.
तसेच पोटाचे विविध व्यायाम करता येतात. पोट कमी करणं हा तर बहुतांश सगळ्यांचा व्यायाम करण्याचा सूप्त वा उघड हेतू असतोच. त्यातला सगळ्यात प्राथमिक व्यायाम म्हणजे क्रंचेस किंवा सिटअप्स. पाठीवर झोपायचं आणि कसलाही आधार न घेता उठून बसायचं आणि परत आडवं व्हायचं हा व्यायाम दिसायला अगदी सोपा असला तरी ज्याने तो कधीच केलेला नाही त्याला तो करणं तितकंसं सोपं नसतं. त्यामुळे त्यावरचा उपाय म्हणजे खिडकीच्या गजाला किंवा पलंगाच्या पायाला एखादी दोरी किंवा ओढणी बांधायची आणि उठायच्या वेळी तिची थोडी मदत घ्यायची. काही जणींना सुरुवातीला परत झोपतानाही दोरीचा आधार घेऊन व्यायाम करायला लागू शकतो.
अशी मदत घेत व्यायाम करायची आयडिया फिटनेसच्या वेडाने झपाटलेल्या मनाला काही वेळा आवडत नाही. पण त्याला समजावून सांगायचं, की हे आपल्याला करायलाच लागणार आहे, कारण त्यानेच आपला फिटनेस वाढणार आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER