Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

माढा लोकसभेतील जनतेच्या पाठींब्यावर गुलाल आपलाच : धैर्यशील मोहिते पाटील यांना विश्वास

टीम : धैर्य टाईम्स
नीरा - देवधर धरणाविषयी बोलताना धैर्यशील मोहिते - पाटील म्हणाले, या धरणासाठी विजयदादा व रामराजेंनी १९८४ पासून प्रयत्न केले. जमिनीचे अधिग्रहण करुन घेतले. मध्यंतरी १५ - २० वर्षे विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यपाल महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना स्टे दिला. त्यामुळे निधी मिळाला नाही म्हणून ही योजना रखडली.

फलटण प्रतिनीधी - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब व विजयदादा यांनी टाकलेला विश्वास माढा लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेल्या पाठींब्याच्या जोरावर ४ जूनला गुलाल आपलाच उधळला जाईल असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

माढा लोकसभा मतदारसंघाच्या झंझावती प्रचार दौ-याची आज उत्साहात सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना मोहिते पाटील म्हणाले, नेते कुठेही असू द्यात, जनता आमच्या पाठीशी आहे. गेल्या पंधरा दिवसात विजयदादा व बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदार संघातील ८३५ गावांचा आपण झंझवती प्रचार दौरा केला. महाविकास आघाडील नेत्यांनी प्रचाराची बाजु संभाळली. त्यांच्या प्रचार सभांना जनतेने उत्स्फुर्त पाठिंबा दिला व या सभा यशस्वी केल्या. जनतेनेच ही निवडणुक हातात घेतल्याने आमचा विजय निश्चित आहे .

२०१९ ला पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील सहा जिल्हे व ३१ दुष्काळी तालुक्यातील शेतीला कृष्णा - भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून पाणी मिळावे यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला. यामध्ये आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नव्हता. पक्षाने लोकसभेला दिलेल्या उमेदवाराला एक लाख १६ हजार मतांचे मताधिक्य देवून विजयी केले. अटीतटीच्या लढतीत एका रात्रीत नवख्या सातपुतेंना आमदार केले. जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणली. तीन नगरपालिका व माळशिरस पंचायत समितीत भाजपाची सत्ता आणली. तरीही आम्हाला गद्दार म्हटले जाते. ज्यांना खासदार म्हणून आम्ही निवडून दिले त्यांना त्यांच्या तालुक्यात एक ग्रामपंचायत सुध्दा आणता आली नाही आणि माढा लोकसभेतील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी साधा उमेदवारही मिळाला नाही. तरीही ते निष्ठावंत ? वारे न्याय अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ना देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी आमच्या मनात कोणताही राग अथवा द्वेश नाही पण खा नाईक निंबाळकर, आ.जयकुमार गोरे व आ. श्रीकांत भारतीय यांनी आमच्या विषयी चुकीची माहिती देवून नेतृत्वाचे कान भरले हे चुकीचे आहे. काल पर्यंत आम्ही चांगले होतो पक्ष सोडला की गुंड झालो काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

नीरा - देवधर धरणाविषयी बोलताना मोहिते पाटील म्हणाले, या धरणासाठी विजयदादा व रामराजेंनी १९८४ पासून प्रयत्न केले. जमिनीचे अधिग्रहण करुन घेतले. मध्यंतरी १५ - २० वर्षे विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यपाल महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना स्टे दिला. त्यामुळे निधी मिळाला नाही म्हणून ही योजना रखडली. आता हा स्टे उठला आहे. नीधी आला आहे. त्यामुळे नीरा - देवधर योजना सुरु झाली. पवार साहेब, विजयदादा, रामराजे यांनी कधी श्रेयासाठी काम केले नाही. परंतु अलिकडे काम न करता पाणीदार, जलनायक अशा बिरुदावली लावून फिरणारे वाढले आहेत असे म्हणत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. गोरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. 

लोणंद - पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सोडविला म्हणणा-या खासदारांनी पुणे - फलटण रेल्वेच्या गेटवर साधा गेटमन नेमला नाही. रेल्वेचा ड्रायव्हरच गेट उघडतो व बंद करतो अशी सध्या शोकांतीका आहे असे सांगून केंद्राच्या अनेक योजना आहेत. त्यातीलच एक अंध - अपंग लोकांसाठी योजना होती . आपण माळशिरस तालुक्यात १०० टक्के ती यशस्वी केली. लोकांना लाभ मिळवून दिला . परंतु सातारा जिल्ह्यात खासदारांना योजनाच माहित झाली नाही. प्रशासनाने ती राबविल्यावर यांना कळले. आज खालच्या पातळीवर जावून आमच्यावर टीका करतात, आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते परंतु आमच्या घरावर सहकार महर्षीचे संस्कार आहेत,पवार साहेब व विजयदादांनी सांगितले आहे की आपण पातळी सोडून बोलायचे नाही म्हणून आम्ही गप्प आहे. जनता आता दुधखुळी राहिली नाही. येत्या सात तारखेला मतदानाच्या माध्यमातून ती माढा लोकसभेत नक्कीच परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माढा लोकसभेतील शेती व शेतक-यांच्या शेतीला पाणी, युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रत्येक तालुक्यात मिनी एम.आय.डी.सी. केळी संशोधन केंद्र, किसान रेल्वे आदी प्रश्नाबाबत आपण सतर्क राहून काम करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER