फलटण प्रतिनिधी : 26 एप्रिल -
धैर्य टाईम्स क्राईम स्पेशल
मलटण येथील कुंभारभट्टी येथे घरात 2 लाख 44 हजार 600 रुपये किंमतीचा एकूण 12 किलो 230 ग्रँम गांजा शहर पोलीसांनी जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिंनाक २५ रोजी ४:३५ वाजण्याचा सुमारास कुंभारभट्टी मलटण ता. फलटण जि. सातारा येथे युवराज बाळु मोरे (वय-38 वर्षे) व रामा राजेश जाधव (वय 30 वर्षे दोन्ही रा.कुंभारभट्टी मलटण ता. फलटण जि. सातारा) यांनी त्यांचे राहते घरातली आतील खोलीमध्ये एका पोत्यात 12 किलो 170 ग्रँम तसेच 60 ग्रँम वजनाचा 9 पुढ्या हिरव्या काळया रंगाचा उग्र वासाचा ओलसर गांजा सदृश्य पदार्थ मिळून आल्याने पंचासमक्ष व राजपञीत अधिकारी यांचे समक्ष पो.उप.नि. शिंदे व पोलीस पथक यांनी वजनकाटा धारक यांचे मार्फतीने पोत्यातील मिळाल्याचे मालाचे वजन करून त्यातील हिरव्या काळया रंगाचा उग्र वासाचा ओलसर गांजा सदृश्य पदार्थाची दिसून आल्याने त्यांचे वजन केले असता ते एकूण 12 किलो 230 ग्रँम भरले व मालाची एकूण किंमत 2 लाख 44 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल युवराज बाळु मोरे व रामा राजेश जाधव यांनी बेकायदा बिगरपरवाना स्वत:चे फायदयाकरीता गांजा विक्री करण्याकरीता स्वत:चे कब्जात बाळगले स्थितीत आढळून आला याबाबत शहर पोलीस ठाण्यात पो.ना सचिन सुर्यकांत जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.उप.नि. कदम करत आहेत.

















