Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

अनधिकृत विहीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी : साठवण टॅंकच्या भिंतीला तडे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण | धैर्य टाईम्स |

वाठार निंबाळकर येथील एका शेतकऱ्यांने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँकलगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांना हाताशी धरून विनापरवाना अनधिकृतपणे विहीर काढण्यास घेतल्या प्रकरणी सबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी, फोकलेन चालक-मालक व संबधित शेतकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून फोकलेन जप्त करून कारवाई करण्याची मागणी वाठार निंबाळकर येथील ग्रामस्थांनी केली आहे.


वाठार निंबाळकर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार निंबाळकर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँकलगत विहीर घेण्यास निर्बंध घातला असतानाही भूजल अधिनियम तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांना हाताशी धरून संबधित शेतकरी यांनी फोकलेनच्या साहाय्याने कोणत्याही शासकीय विभागाची पूर्व परवानगी न घेता विहीर खुदाई केली आहे. पिण्याच्या साठवणूक टँकलगत विहित घेत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना कळवूनही याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. सदरच्या विहिरीच्या कामामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँक संरक्षण भिंतीला गेलेले तडे गेले असून मोठे नुकसान प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे झाले आहे.


फलटण तालुक्‍यात भूजल अधिनियम अंतर्गत असणाऱ्या तरतुदीस हरताळ फासत विहीर घेण्याचा सपाटा सुरूच असल्याचे चित्र आहे त्यामुळे भूजलपातळी खालावण्यास भरमसाट विहिरी हेही एक कारण आहे. फलटण तालुक्‍यात मागील काळात दुष्काळी परिस्थिती भीषण होती. शासनाने दुष्काळी पार्श्वभूमीवर विहिरी घेण्यास निर्बंध घातले आहेत. शिवाय विहीर घेण्यासाठी संबंधिताने पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे; परंतु फलटण तालुक्‍यात या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी नियमबाह्य विहिरी घेण्यास सुरवात केली आहे. शासकीय सार्वजनिक पाणी साठवण टँकलगत व विहिरीलगत व ईतर जलस्त्रोत लगत ५०० मीटर अंतराच्या आत विहिरी सर्रास घेतल्या जात असून, त्यातून आधीच खालावलेली भूजल पातळी अधिकच धोक्‍याकडे जाण्याची शक्‍यता आहे.


सध्याही सर्वाधिक विहिरी विनापरवानगी घेतल्या जात असल्याचे दिसून येत आहे. शेतीतही विहिरी व बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने भविष्यात हे प्रमाण वाढत जाईल, अशी स्थिती आहे. विहिरी घेण्यासाठी नियमबाह्य फोकलेन मशिनरी वापरल्या जात आहेत. 


 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे पश्चिम भागात नियमबाह्य विहरी व बोअरवेल घेण्याचे व त्याची नोंद सातबारा सदरी करण्याचे प्रमाण वाढले असून त्या यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास भविष्यात तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत अधिकच भर पडणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्यासह संबधित शेतकरी व फोकलेन गाडी चालक -मालक यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी 
विहिर काढणारा फोकलेन जप्त करण्याची आवश्यकता असून तत्काळ विहीर बुजवून सबंधित शेतकरी व फोकलेन चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संरक्षण भिंतीस गेले तडे 
विहिरीचे कामामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँक संरक्षण भिंतीला तडे गेले असून या प्रकरणी संबंध शेतकरी व फोकलेन मालक यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची आवश्यकता 


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER