Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

पोलिस भरती पेपर फुटीचे फलटण कनेक्शन?

टीम : धैर्य टाईम्स

मुंबई पोलीस भरती परीक्षा पेपर फुटीत पोलीस कर्मचारी सामील असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर पोलीस भरती उमेदवार यांनी सांगितली आहे

फलटण प्रतिनिधी : 

मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याची बाब नुकतीच उघड झाली असून या प्रकरणात फलटण तालुक्यातील अनेक महाभाग व उमेदवार असल्याची माहिती मिळत असुन या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असून वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास फलटण येथे येवून करणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाला असून लेखी परीक्षेच्यावेळी पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी गुगल सर्च करून बटण कॅमेऱ्याच्या माध्यमातून परीक्षेचा पेपर बाहेर पाठवून सार्वजनिक करत मायक्रोफोनद्वारे प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यासाठी परीक्षार्थीकडून प्रत्येकी १० ते १२ लाख रुपयांची लाच घेण्यात आल्याचे अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी बोलून दाखवत आहेत. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेक जणांनी भेट घेऊन पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याबरोबरच मुंबई पोलिस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करत आहेत.

अनेक सैन्य तसेच पोलिस भरती परीक्षेतील पेपर फुटीचे केंद्र असणारा फलटण तालुका यावेळीही मुंबई पोलिस भरती परीक्षा पेपर फुटीमध्ये आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिस भरती पेपर फुटीमध्ये फलटण तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील व जिल्ह्यातील 100 ते 125 विद्यार्थी सहभागी असल्याची माहिती मिळत असून या विद्यार्थ्यांनी फलटण तालुक्यातील अनेक भरती केंद्र चालक यांच्या सहकार्याने या पेपर फुटित सहभाग घेतला होता अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे.जे उमेदवार लगेचच पैसे देऊ शकत नाहीत अथवा निम्मे पैसे देऊ शकतात अशा उमेदवारांची मूळ शालेय कागदपत्रे केंद्र चालक सिक्युरिटी म्हणून ठेवत असल्याची माहिती मिळत आहे 

याप्रकरणी तापासकामी अनेक जणांच्या उचल बांगड्या होणार असून अनेकांची पितळे थोड्या दिवसात उघडी होणार आहेत. फलटण तालुक्यातील कोणा कोणाचा सहभाग आहे तसेच किती विद्यार्थी यात सहभागी आहेत व किती रक्कम पेपर फोडण्यासाठी दिली हे तपासानंतर समजणार आहे. कष्ट करून अभ्यास करून भरती करीता बसणाऱ्या उमेदवारांवर अशा पेपर फुटीच्या प्रकरणामुळे अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास येत असून अशा पेपर फुटीच्या प्रकरणास कायमचा अंकुश लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER