फलटण प्रतिनीधी:- डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथे एका व्यापारस खंडणी मागितल्या प्रकरणी एका तरुणाचे विरोधात शहर पोलीस ठाण्यात खंडणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.३० जुलै रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण, ता.फलटण येथील फिर्यादी व्यापारी यांच्या किराणा दुकानात संशयीत आरोपी अदित्य अहिवळे हा दुकानात येवुन "मला सिगारेटचे पाकीट दे, असे म्हणाला. त्यावेळी त्यास व्यापारी याने नकार दिला असता, त्याने दुकानातील लोखंडी खुर्ची फेकुन मारून फिर्यादी व्यापारी यांच्या डाव्या हातास किरकोळ दुखापत केली व "मला दर महिना ५०० रूपये खंडणी देत जा" असे म्हणुन सिगारेटचे पैसे न देता, दुकानाचे बाहेर पडलेला दगड फेकुन मारला परंतु तो दगड फिर्यादी ने चुकवला अशी फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली असून अधिक तपास म.पो.हवा. वाघ करत असून अदित्य अहिवळे या संशयित आरोपीस ३१ जुलै रोजी अटक केली असून न्यायालयात हजर केला असता, त्याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.



















