सातारा दि. 16 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मुक्त, स्वच्छ व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता 12 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणूकीकरिता निवडणूक क्षेत्रात गुरुवार दि. 18 मे 2023 रोजी खालील अटीस अधिन राहून स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, अद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स रिटेलर्स इ. या आस्थापनामधील कामगारांना गुरुवार दि. 18 मे 2023 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
मतदानाच्या दिवशी ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रात कामगाराच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा आस्थापनेतील/ निवडणूक क्षेत्रातील उद्योगातील कामगार तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम / अखंडीत उत्पादन सुरु असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात येत आहे.

या आदेशाच्या अनुषंगाने संबंधितांनी आवश्यक ती उपाययोजना करावी. तसेच आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.

















