Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी विश्वासाचा आधार : पत्रकार अनिल पिसाळ फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू महिला दिनानिमित्त फलटण रनर्स फाऊंडेशनकडून सौ. अनुजा त्रिपुटे यांचा सत्कार फलटण येथे ६ मार्च रोजी मधुमेह रुग्णांसाठी १००% शुगर मुक्त मार्गदर्शन शिबिर फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न : जयंती मार्गातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान चि. प्रणव दयानंद मोरे यांची NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी कामगिरी बार्टीच्या मार्गदर्शनातून शुभम मोरे यांना MPSC CET मध्ये राज्यात 204 वा क्रमांक; पिंप्रद येथे सत्कार बुलेटच्या फटफट आवाजावर व बिना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई सुरू - एका नगरसेवकाकडून काही बुलेट तसेच बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना फोन फलटण नजीक डी-मार्ट बांधकामावर वाद : परवानग्यांविना काम सुरू असल्याचा आरोप, नागरिकांमध्ये संताप गाव पांढरीच्या वैभवखुणा या ग्रंथास शिविम साहित्य पुरस्कार जयपूर येथील 'नियाम' संस्थेच्या पदवीदान समारंभात अनिकेत शिंदे यांचा गौरव उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय फलटण येथे ९ वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन २७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर जिद्द, संघर्ष,सातत्य व चिकाटी यांची गरज - प्रा. दादासाहेब चोरमले फलटण न्यायालय परिसरात संविधान उद्देशिकेचा शिलालेख बसविण्याची मागणी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग व नवनियुक्त पंचायत समिती सदस्य सचिन अभंग अध्यक्ष यांच्या वतीने उत्तरेश्वर मंदिरात होणार मोफत लस्सी वाटप लक्ष्मीनगरमधील खूल्या जागेची स्वच्छता; नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद : नूतन नगरसेवक संदीप चोरमले यांचा प्रभाग क्रमांक ११ मध्ये विविध कामांचा धडाका रस्त्यावर माल व हातगाडे ठेवू नका; अन्यथा जप्तीची कारवाई – फलटण नगरपरिषदेकडून विक्रेत्यांना सूचना पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न जनतेने हाणून पाडला - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग प्रा. जावेद शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान प्रभाग क्रमांक दोन मधील विविध कामांसाठी डॉ. आंबेडकर जयंती मंडळाचे नगरपालिकेला निवेदन फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; लाडक्या बहिणींनी रांगा लावून केले मतदान कोळकीत भाजप उमेदवार जयकुमार शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला; मतदारांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणाली करण्यासाठीची अधिकृत ई-निविदा शासनाकडून प्रसिद्ध तरडगावच्या शेकडो युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश - माजी आमदार दिपकराव चव्हाण यांना जोर का झटका ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांची विडणी येथे उद्या मंगळवारी जाहीर सभा : लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती राजकारणाची खुमखूमी होती तर स्वतःच्या मुलाला का उभे केले नाही - सरपंच सागर अभंग यांचा डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यावर घणाघात भाजपाचे साखरवाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्रीमंत रामराजे यांचे लाभार्थी : संजीवराजे यांचे टीकास्त्र कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)पंचायत समितीचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचाराचा शुभारंभ ॲड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न सुनेत्राताईंच्या ऐतिहासिक निवडीला गैरहजर, रामराजेंची निष्ठा कुणाशी? खर्डेकरांचा सवाल इकडून तिकडे व पंधरा दिवसात पक्ष बदलणारे गावाचा विकास करू शकले नाहीत ते जिल्हा परिषद गटाचा काय विकास करणार? आमदार सचिन पाटील यांची सह्याद्री कदम यांच्यावर टीका सौ.विमलताई साळुंखे पाटील व सौ. शरयू ताईंच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या माध्यमातून धनंजय दादांच्या तसेच विष्णू लोखंडे यांच्या प्रचारार्थ झंझावाती प्रचार जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विज्यासाठी तरुण फौज प्रचाराचा मैदानात पिंपरद येथे सौ. सुषमा ताई मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांनी घरोघरी जात केला प्रचार अजितदादा यांच्या सारखे कणखर नेतृत्व पुन्हा घडणार नाही,शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेत पाठिंबा दिला - आमदार सचिन पाटील

धुमाळवाडीत पर्यटकांना लुटणा-या टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांकडुन अवघ्या आठ तासात पर्दाफाश !

जिवाची पर्वा न करता पाठलाग करुन तीन सराईत गुन्हेगारांना केले जेरबंद
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 


फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील नयनरम्य धबधबा अलिकडील काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. त्यामुळे याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. दि.८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा पाहुन पर्यंटक आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले असताना लाकडी दांडकी व लोखंडी सु-याचा धाक दाखवुन लुटमार केली होती. याप्रकरणी धुमाळवाडी व वारुगडच्या डोंगरकपारीतून फलटण ग्रामीण पोलीसांनी चित्तथरारक ट्रेकींग करुन जिवाची पर्वा न करता पाठलाग करुन तीन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले असून पर्यटकांना लुटणा-या टोळीचा फलटण ग्रामीण पोलीसांनी अवघ्या आठ तासात पर्दाफाश केला आहे.


याविषयी फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि.८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा पाहुन परतणाऱ्या पर्यटकांना वारुगडच्या टेकडीवरुन टेहाळणी करणा-या एकुण १० इसमांनी महिला पर्यटकांना हेरुन धबधब्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर गाठुन त्यांना लाकडी दांडकी व लोखंडी सु-याचा धाक दाखवुन लुटमार केली होती. 

यामध्ये पर्यटक महिलांच्या गळ्यातील सोन्याचांदीचे दागिने व पर्यटक पुरुषाकडील मनगटी घड्याळ व पैसे असा एकुण ५४५००/-रु. किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेल्याची घटना घडली होती. पिडीत महिला ह्या मदतीसाठी मोठमोठ्या ओरडुन आर्जव करीत असताना सदर घटनेची माहिती धुमाळवाडी गावच्या पोलीस पाटील सौ. पल्लवी शरद पवार यांना मिळाली. त्यांनी प्रसंगावधान ओळखुन लागलीच फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांना माहिती कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 



सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे वारुगड डोंगराच्या पायथ्याला, डोंगरकपारीमध्ये असल्यामुळे त्याठिकाणी तात्काळ पोहोचणे शक्य नव्हते. परंतु पोलीसांनी घटनेचे गांर्भीय ओळखुन आपला अनुभव व व कसब पणाला लावुन केवळ पिडित महिलांनी संशयितांबाबत सांगितलेल्या तुटपुंज्या वर्णनावरुन सुमारे १० कि. मी. ओढ्यानाल्यातून, दगडधोंड्यातून व डोंगरदरीतून अंधारामध्ये सुमारे सहा तास पाठलाग करुन तीन संशयित इसमांना पकडले आहे. त्यांची नावे 1. दिपक नामदेव मसुगडे, वय 30 वर्ष, रा. नवलेवाडी, मलवडी, ता. माण, जि. सातारा 2. विलास उर्फ बाबु दत्तात्रय गुजले वय 21 वर्ष, रा. खांडज, ता. बारामती, जि. पुणे 3. चेतन शंकर लांडगे वय 25 वर्ष, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा अशी आहेत. सदर संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्हा करताना वापरलेला चाकु व बजाज पल्सर मोटार सायकल काढुन दिल्यामुळे ती जप्त करण्यात आली आहेत.

सदर गुन्ह्यामध्ये वरील अटक आरोपींव्यतिरिक्त 1. रणजित कैलास भंडलकर 2. तानाजी नाथाबा लोखंडे दोघे रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा 3. अक्षय महादेव चव्हाण, रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे 4. वैभव सतिश जाधव, 5. रामा शंकर जाधव 6. सुरज कैलास जाधव, रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा सहभाग निष्पन्न झाला आहे. सदरचे संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारमारी व विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.


सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी सो, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल धस सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वात दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, पोलीस अमंलदार वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, हणमंत दडस, तुषार नलवडे, कल्पेश काशिद, नितीन धुमाल, निलेश कुदळे, अक्षय खाडे यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये धुमाळवाडी गावचे नागरिक शरद पवार यांनी फलटण ग्रामीण पोलीसांशी सुसवांद साधुन घटनेची अचुक माहिती दिली होती. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक करीत आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER