फलटण शहर व तालुक्यामध्ये वादग्रस्त विधान किंवा पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था यास बाधा निर्माण होईल असे मेसेज व्हाट्सअप या सोशियल मीडिया वरती वरती पोस्ट होऊ नये याकरिता फलटण शहर व तालुक्यातील व्हाट्सअप ग्रुप अँडमिननी ओन्ली फॉर अँडमिन ही सेटिंग करावी असे आवाहन फलटण शहर पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.
या विषयी आगामी काळात येणाऱ्या सण /उत्सवाच्या अनुषंगाने सोशल मीडियाचा वापर करीत असताना, दोन समाज /दोन गट, जात /धर्म यामध्ये तेढ किंवा वाद होईल, अश्या कोणत्याही पोस्ट व्हाट्स अँप ग्रुप,सोशल मीडियावरती ,पोस्ट करण्यात येऊ नये अन्यथा, योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पो.नि. पाटील यांनी म्हटले आहे.
या संदर्भात व्हाट्सअप ग्रुप अँडमिन यांनी ओन्ली फॉर अँडमिन ही सेटिंग करून वादग्रस्त विधान किंवा पोस्टमुळे समाजात तेढ, कायदा व सुव्यवस्था यास बाधा निर्माण होईल असे मेसेज पोस्ट करण्यात येऊ नये, याबाबतची जबाबदारी ग्रुप अँडमिन ची राहील, अन्यथा सदर वादग्रस्त ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट मेसेज , फोटो प्रसारित करण्यास ग्रुप अँडमिन ची मुकसंमती आहे असे गृहीत धरून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर यासंबधी सायबर सेलची अशा पोस्टवर 24 तास लक्ष राहणार असल्याचे पो. नि. पाटील यांनी म्हटले आहे. सर्व नागरिकांना फलटण शहर पोलीस स्टेशन च्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन शेवटी पाटील यांनी केले आहे.



















