फलटण प्रतिनिधि -
विडणी गणाचे भाजपचे उमेदवार सचिन गजानन अभंग यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून आज धुळदेव येथे तरुणांच्या तसेच जेष्ठ मार्गदर्शकांचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण गावात प्रचार केला.
पंचायत समिती विडणी गणातील तरुण तडफदार उमेदवार सचिन अभंग यांनी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, तसेच विडणी गावचे लिकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली विडणी ग्रामपंचायत सदस्य पदी निवडून आल्या पासून संपूर्ण विडणी गावासाह वाडीवस्तीवर विकासाची गंगा पोहोचवली असून त्यांनी सातारा जिल्हा परिषद असेल किंवा फलटण पंचायत समिती असेल या ठिकाणावरून मिळणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असुन त्याच अनुषंगाने त्यांना विडणी पंचायत समितीची उमेदवारी भाजप तसेच मित्र पक्षाकडून मिळाली असून त्यांच्या प्रचारासाठी मोठी तरुणांची फौज काम करीत असल्यामुळे त्यांचा विजय मोठ्या फरकाने होईल असा विश्वास विडणी गणातील मतदारांनी व्यक्त केला आहे.


















