Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील

सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आमदार सचिन कांबळे पाटील व नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक-निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 


सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण यांच्या वतीने मंगळवार पेठेतील बुद्ध बंगला येथे दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास आमदार सचिन कांबळे पाटील, नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.


माजी नगरसेवक सनी अहिवळे व नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे हे गेल्या २२ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत हजारो गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शालेय साहित्य, दप्तर, वह्या व पुस्तके देत प्रोत्साहन देत आहेत. याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गौरवपत्र, दप्तर व शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांना रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी बोलताना आमदार सचिन कांबळे पाटील यांनी सनी अहिवळे व सुपर्णा अहिवळे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फलटण नगर परिषद शाळा क्रमांक २ साठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले. तसेच फलटणमधील मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक-निंबाळकर यांनी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत शिक्षणातूनच समाज परिवर्तन घडते, असे मत व्यक्त केले. फलटण नगर परिषद शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी संगणक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.


माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनी, “बुद्ध निवासच्या दारात आलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही रिकाम्या हाताने पाठवले नाही. भविष्यातही ‘मिशन 100 डॉक्टर-इंजिनिअर’ सारखे उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले.


उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजीत भोसले, विजय येवले, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेविका मीना जीवन काकडे, नगरसेवक सुदाम मांढरे, नगरसेविका सिधाली अनुप शहा, बी. टी. जगताप यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश काकडे यांनी केले, तर नगरसेविका सुपर्णा सनी अहिवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER