फलटण प्रतिनिधी -
सुरवडी (ता. फलटण) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व शुभारंभ सोहळा उद्या रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या विकासकामांचे भूमिपूजन फलटण तालुक्याचे लोकप्रिय नेते माजी खासदार मा. रणजितसिंह ना. निंबाळकर (दादा) यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी फलटण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेर सिंह ना. निंबाळकर (दादा) यांचा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मा. श्री. प्रल्हाद पाटील (तात्या) यांच्या शुभहस्ते कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.
या कार्यक्रमास तालुक्यातील विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, सुरवडीच्या सर्वांगीण विकासासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत.
तरी या कार्यक्रमास सुरवडी पंचक्रोशीतील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सुरवडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे



















