Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

फलटणमध्ये घुमणार तुतारीचा नाद ? माढ्यात रंगणार नवी राजकीय गणिते?

टीम : धैर्य टाईम्स
सचिन मोरे, फलटण.

लोकसभा निवडणुकीचे घुमशान संपूर्ण देशात सुरू झाले आहे. अनेक ठिकाणचे उमेदवार निश्चित होऊन प्रचाराच्या फेऱ्या सुरू झाले आहेत. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही कायमच असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील सहयोगी पक्ष भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना व आर. पी. आय. (आठवले गट ) यांची माढा लोकसभेतील उमेदवारी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीने उमेदवार बदलावा यावरच ठाम असल्याचे समजते आहे. तर अकलूज मधून मोहिते- पाटील यांनी आपला विरोध कायम ठेवला असल्याच्या चर्चा सुरु आहेत. महायुतीने उमेदवार बदलावा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा असाच काहीसा गर्भित इशारा फलटणचे नाईक- निंबाळकर व अकलूजचे मोहिते - पाटील यांनी दिल्याचे सध्या तरी चित्र दिसते आहे. तर मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार ) खासदार अमोल कोल्हे यांनी थेट अकलूज गाठत मोहिते पाटलांची लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते - पाटील हे हाती तुतारी घेत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. तर फलटणचे नाईक - निंबाळकर यांच्या माध्यमातून लवकरच फलटणमध्ये तुतारीचा नाद घुमेल व शरद पवार यांच्याबरोबर पुन्हा एकदा एकत्र येत नवी राजकीय चाल खेळली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

माढा लोकसभा मतदार संघातील फलटण - कोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ येतो. गेली 32 वर्षाहून अधिक काळ फलटणच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी रामराजेच आहेत. 

तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसची काडीमोड घेतली व भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत थेट माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घेत मोठा विजय संपादन केला. वास्तविक रामराजे यांच्यापेक्षा राजकारणात नवख्या असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभेतून थेट दिल्ली गाठल्याने रामराजेंच्या स्थानिक राजकारणावर याचा मोठा परिणाम झाल्याचे सध्या दिसू लागले आहे. फलटणचे स्थानिक राजकारण टिकवायचे असेल तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची वाढती राजकीय ताकद रामराजे यांच्यासाठी धोक्याची घंटा होऊ शकते. त्यामुळेच खासदार रणजितसिंह यांची उमेदवारी बदलावी असा अट्टाहास रामराजे यांनी महायुतीकडे किंबहुना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र रामराजेंच्या मागणीची महायुती कडून विशेष दखल घेतली जात नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे एकूणच रामराजे गटामध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी मिळावी याकरिता फलटणमध्ये काही दिवसापूर्वी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करीत रामराजे वरिष्ठांवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचे बोलले गेले होते. वास्तविक गेली 32 वर्ष फलटण तालुक्यातील स्थानिक राजकारण संजीवराजे यांच्याशी जोडले गेले आहे. तर त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून केलेले काम विशेष उल्लेखनीय असेच राहिले आहे. गेली तीन दशके स्थानिक राजकारण करीत असताना पूर्वी कै. माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर तर आता त्यांचे सुपुत्र महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी कडवा राजकीय विरोध केला आहे. मात्र आता महायुती धर्मामुळे पारंपारिक राजकीय विरोधक खासदार रणजितसिंह यांच्या उमेदवारीने रामराजे गटासमोर मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.  एकीकडे महायुतीचा धर्म तर दुसरीकडे स्थानिक राजकीय विरोधक खासदार रणजितसिंह यांना मिळालेली उमेदवारी अशा दुहेरी कात्रीत रामराजे नाईक -निंबाळकर सापडले आहेत. 

तुतारीचा काय होईल परिणाम?

फलटणच्या रामराजे नाईक - निंबाळकर यांनी तीन दशके केलेला राजकारणात सत्तेपेक्षा विकास कामांना व राजकारणातील एकनिष्ठतेला विशेष प्राधान्य दिल्याचे दिसते आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बरोबरीने तुतारी हातात घेतल्यास या मतदार संघात परिवर्तन होईल असे राजकीय जाणकार सांगतात. त्यासंबंधी विश्लेषण करताना असे बोलले जात आहे की फलटण - कोरेगाव विधानसभा हा स्थानिक मतदार संघातून रामराजे गटाला मोठया मताधिक्याने मतदान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर माण - खटाव मतदान संघातून मधून सरासरी मतदान होतानाच माळशिरस मतदार संघातून आघाडी मिळेल. मात्र माढा मधून व करमाळा हे मतदार संघ कमी जास्त फरकाने तर सांगोला मतदार संघातून बरोबरीचे मतदान रामराजे गटाला मिळून मतदार संघात परिवर्तन होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषक सांगतात.

माढा लोकसभा मतदारसंघात फलटणच्या नाईक - निंबाळकर परिवाराचा वेगळा प्रभाव आहे. तर तब्बल तीन दशकांचे एक हाती राजकारण व उभा केलेला गट कायम बरोबर ठेव्यासाठी धैर्यशील मोहिते -पाटील व संजीवराजे नाईक - निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह यांचे राजकीय विरोधक एकत्र करीत बैठका व चर्चासत्र सुरू ठेवली आहेत.

 राजकीय सत्तेसाठी वेगवेगळ्या पक्षात जाणारी अनेक राजकीय घराणे महाराष्ट्राने पाहिलेली आहेतच. त्यामुळे फलटणचे राजघराने काही वेगळा निर्णय घेणार का याचे उत्तर काही दिवसात मिळेल. तर श्रीमंत रामराजे नाईक - निंबाळकर माढा लोकसभा मतदार संघात खासदार रणजितसिंह यांना बळ देऊन महायुतीधर्म पाळणार की फलटणमध्ये घुमणार तुतारीचा नाद हे लवकरच कळेल. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER