फलटण प्रतिनिधी : क्राईम स्पेशल,
राजुरी येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २४ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला फिर्यादी महिलेच्या घरासमोर कट्यावर प्रशांत पोपट रणदिवे (राहणार राजुरी तालुका फलटण) यांनी फिर्यादी महिलेस घरातून बाहेर बोलावून विनयभंग करत उजवा हात धरून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व तू याबाबत कोणाला काही सांगितले तर मी तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली तसेच फिर्यादी महिलेस व तिच्या घरच्यांना वारंवार शिवीगाळ दमदाटी करीत आहे अशी फिर्याद महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली असून अधिक तपास पो हवा करणे करत आहेत.


















