Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचं निधन

टीम : धैर्य टाईम्स

ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे प्रसिद्ध माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचं रविवारी निधन झालं. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बाल साहित्यात त्यांचं मोठं योगदान होतं. जनमानसामध्ये 'अँकर' हा शब्द रूढ झालेला नसतानाचा काळ. तेव्हा होते वृत्तनिवेदक तेव्हा होते फक्त 'वृत्त निवेदक'. वृत्त निवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गज्जांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. चित्रपटांव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी 'दूरदर्शन' हे एकमेव दृकश्राव्य माध्यम होतं. छोटा पडदा म्हणजे 'दूरदर्शन' - दूरदर्शन म्हणजे बातम्या- बातम्या म्हणजे अनंत भावे, असं समीकरण. "नमस्कार. आजच्या ठळक बातम्या" अनंत भावे यांनी म्हणताक्षणीच प्रेक्षक बातम्यांसाठी सरसावून बसत असत.अनंत भावे यांची वैशिष्ट्यं : अनंत भावे, प्रदीप भिडे, वासंती वर्तक ही वृत्तनिवेदक मंडळी प्रेक्षकांच्या जणू कुटुंबाचा एक भाग बनून गेली होती. प्रत्येकाची स्वतंत्र वैशिष्ट्यं होती. धीर गंभीर आवाज, स्पष्ट शब्दोच्चार, चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणि 'दाढी' ही अनंत भावे यांची वैशिष्ट्यं. अनंत भावे यांच्या दाढीवर अनेक विनोदही झाले होते. मुख्य म्हणजे आपल्या दाढीवरच्या विनोदांना अनंत भावे अतिशय मनमुराद दाद देत.अतिशय उत्तम आणि दर्जेदार वृत्तनिवेदक असलेले अनंत भावे हे सकस साहित्य लिहिणारे साहित्यिकही होते. स्तंभलेखक म्हणूनही ते नावाजले गेले. बालवाङ्मयासाठी तर त्यांनी अतिशय मोठं योगदान दिलं.प्रसिद्ध बालवाङ्‌मय आणि बालकविता :अनंत भावे यांनी अनेक बालवाङ्‌मय, बालकविता लिहिल्या आहेत. 'अग्गड हत्ती तग्गड बंब','अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी', 'अब्दुल गब्दुल', 'अश्शी सुट्टी सुरेख बाई!', 'उथ्थाप्पाचे उंदीर', 'कासव चाले हळू हळू', 'गरागरा गरागरा', 'गारगोटी झाली आकाशचांदणी', 'गिरकी घेऊन कबुतर सांगतंय', 'घसरगुंडी पसरगुंडी', 'चल रे भोपळो टुणुक टुणुक', 'चला खाऊ पाणीपुरी', 'चिमणे चिमणे', 'चेंडूच्या फिरक्या' असे विविध प्रसिद्ध बालवाङ्‌मय आणि बालकविता अनंत भावे यांनी लिहिल्या.



पत्रकार, लेखक म्हणून ते अतिशय सजग होते. कुणावरही टीका करताना ते भीड बाळगत नसत. मात्र त्यांची लिखाणाची शैली 'निर्विश' होती. साधा झब्बा, पायजमा, खांद्यावर शबनम झोळी अशा अवतारातले अनंत भावे कोणत्याही साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमात दिसले तर पाहणाऱ्यांच्या नजरा आपोआप त्याच्याकडे वळत असत. आई-बाबा 70 आणि 80 च्या दशकातल्या अनंत भावे यांच्या ग्लॅमरबद्दल आपल्या मुलांना सांगत असत. असं अनेकदा घडलं आहे.साहित्य क्षेत्राचा एक चिरा ढासळला : समाजसेविका, प्राध्यापिका पुष्पा भावे या अनंत भावे यांच्या पत्नी. २०२० साली पुष्पा भावे यांच्या निधनानंतर अनंत भावे यांचा सामाजिक कार्यक्रमांमधला वावर कमी झाला. गेली काही वर्ष ते पुणे येथील आपल्या निवासस्थानी पुस्तकांच्या सहवासात रहात होते. अनंत भावे यांच्या निधनामुळे माध्यम आणि साहित्य क्षेत्राचा आणखी एक चिरा ढासळला आहे.स्तंभलेखन करायचे :अनंत भावे हे एक मराठी साहित्यिक, पत्रकार आणि वक्ते होते. श्री.ग. माजगावकर यांच्या 'माणूस' साप्ताहिकात ते स्तंभलेखन करायचे. हे साप्ताहिक १९८६मध्ये बंद झालं. मुंबईत १९८३ साली भरलेल्या विनोदी साहित्य संमेलनात भावे यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रीय ललित स्तंभलेखनातील विनोदाचे स्वरूप आणि परिणाम हा परिसंवाद झाला होता. तसंच भावे यांचे बरेच बालवाङ्‌मय प्रसिद्ध आहेत. दैनिक महानगरमधील त्यांचं 'वडापाव' सदर गाजलं होतं.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER