Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

जनतेचा जीवासाठी माण पंचायत समितीचा धाडसी निर्णय

पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी देणार 20 लाख रुपये
टीम : धैर्य टाईम्स
माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.

दहिवडी : माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.

माण तालुक्यात सध्या साधारण दीड हजार कोरोनाबाधित आहेत. पण त्यामानाने तालुक्यात आरोग्य सुविधांची वानवा आहे. उणेपुरे चार व्हेंटिलेटर अन् सत्तावन्न ऑक्सिजन बेड तालुक्यात आहेत. तर कोविड सेंटरमध्ये सुद्धा विलगीकरण बेडची संख्या सुद्धा पाहिजे तितकी नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना इतर तालुक्यात, शहरात अथवा जिल्ह्यात उपचारासाठी भटकावे लागते. तर कोविड सेंटरमध्ये योग्य सुविधा वा जागा उपलब्ध नसल्याने अनेकजण घरीच अलगीकरणात राहत आहेत. अनेक रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅबिफ्ल्यू या गोळ्या मिळत नाहीत. तर ऑक्सिजन अभावी कित्येकजण तडफडत असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत. तालुक्यातील नेतेमंडळी तसेच सामाजिक संस्थांनी कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु, अजूनही मदतीची आवश्यकता आहे.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन माण पंचायत समितीचे प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील व त्यांचे सहकारी रमेश पाटोळे, कविता जगदाळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, तानाजी काटकर, लतिका वीरकर, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्रभागा आटपाडकर यांनी कोविड विरुद्धच्या लढ्याला बळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक सदस्याचे दोन लाख असे एकूण वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी मार्गदर्शन केले. 

माणमधील दीड हजार रुग्णांपैकी साधारण एक हजार कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. त्यातील बहुतांशी कोरोनाबाधित गरीब आहेत. त्यांना वैद्यकीय सल्ल्याने फॅबी फ्ल्यू  गोळ्या दिल्या तर ते लवकर बरे होऊ शकतील, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या माणमध्ये कशाची गरज आहे व उपचार पद्धती कशी असावी, हेही त्यांनी समजावून सांगितले. त्यानंतर गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्या सल्ल्याने सदर रक्कम खर्च करण्याचे सुचित केले. 

त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 लाख रुपये फॅबी फ्ल्यू गोळ्यांसाठी, 5.5 लाख रुपये ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी, 2 लाख रुपये जम्बो सिलिंडरसाठी तर 1 लाख रुपये जनजागृतीसाठी वापरण्याचे निश्‍चित करण्यात आले. उर्वरित रक्कमही आवश्यक असेल तशी वापरण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच पुढील कालावधीत लागली तर अजून रक्कम कोरोनाबाधितांसाठी देण्यात येईल, असे सांगण्यात आले. पंचायत समिती सदस्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असून त्यांचे अनुकरण करून ग्रामपंचायत, सोसायटी, कंपन्या, मोठे व्यावसायिक, सामाजिक संस्था यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


माणची जनता कोरोनाच्या भयंकर संकटात सापडली आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या विशेषत: आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. कोविड विरुद्धच्या लढ्यात माण पंचायत समिती जनतेसोबत खंबीरपणे उभी आहे. 
- तानाजी कट्टे-पाटील, प्रभारी सभापती, माण पंचायत समिती

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER