Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 


शेतकरी बांधवांना शेतीविषयक सखोल ज्ञान, अचूक मार्गदर्शन व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करून उद्याच्या भविष्याचा विचार करता विषमुक्त शेती म्हणजेच सेंद्रिय शेती पिकवण्यासाठी तसेच निर्यातक्षम व भरघोस उत्पादन मिळवण्याची नवसंजीवनी देणारी तसेच वनस्पतीजन्य आधारित कीटकनाशके व खतांची निर्मिती करणारी भारतातील प्रथम व अग्रगण्य कंपनी के.बी. बायो ऑरगॅनिक्सला माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी नुकतीच सपत्नीक भेट दिली.

       १९६२ मध्ये भारत देशात हरित क्रांतीची सुरुवात झाली. हरित क्रांतीमूळे सुरुवातीच्या काळात अन्नधान्याचे उत्पादन तर वाढले परंतु भरमसाठ रासायनिक कीटकनाशके व खतांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर खूप मोठे दुष्परिणाम तर होतच आहे शिवाय निर्यातक्षम शेतमाल उत्पादनास खूप मोठा फटका बसत आहे. त्यामुळे केमिकल रेसिड्यू फ्री शेतमाल उत्पादन करणे ही सध्या राज्यातील तसेच संपूर्ण देशातील खूप मोठी समस्या बनली आहे व याच समस्येवर के. बी. उद्योग समूह गेली कित्येक वर्ष यशस्वी पद्धतीने कार्यरत आहे व हे कार्य पाहण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार तसेच अन्य यांनी सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी फलटण येथील के. बी. एक्सपोर्ट व के. बी. बायो ऑरगॅनिक्स या दोन कृषी क्षेत्रातील अनुक्रमे निर्यात व वनस्पतीजन्य आधारित कीटकनाशकांच्या क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कंपनीस भेट दिली. 


त्यावेळी के. बी.एक्सपोर्ट कंपनीचे संचालक सचिन यादव व त्यांच्या पत्नी सौ. सुजाता यादव यांनी शरद पवार व त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई पवार यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान कंपनीच्या सर्व युनिट्सची खासदार पवार यांनी पाहणी केली. यामध्ये सर्व प्रयोगशाळा व त्या अंतर्गत चालणारे काम तसेच संशोधन प्रक्रियेमध्ये कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. कंपनीच्या अद्ययावत प्रयोगशाळांचे त्यांनी कौतुक केले. ‘कृषी क्षेत्रात एका नावीन्यपूर्ण आणि वनस्पतींच्या अल्कोलाईड्सपासून रसायनमुक्त कीटकनाशकांच्या निर्मितीमध्ये एक महत्वाची भूमिका तुम्ही निभावत आहात जी अतिशय उल्लेखनीय असून शेतकऱ्यांचे भविष्य तुम्ही नव्या मार्गावरून यशाकडे घेऊन जात आहात आणि सर्व शेतकऱ्यांच्या हितार्थ कार्य करत असल्याचे त्यांनी कंपनीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभामध्ये आवर्जून सांगितले. यावेळी के. बी उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनीच्या वाटचालीवर आधारित एक माहितीपूर्ण चलचित्रपट खासदार शरद पवार यांना दाखविण्यात आला. तसेच जैविक शेतीचा जागतिक बाजारपेठेतील वाढता प्रभाव, निर्यातक्षम जैविक उत्पादनांची व्याप्ती आणि भारतातील शेतकऱ्यांसाठी असलेली सामाजिक बांधिलकी यावर सविस्तर चर्चा झाली. 

के. बी. उद्योग समूहास शरद पवार यांची सहपरिवार भेट ही के. बी. उद्योग समूहासाठीच नव्हे, तर महाराष्ट्र तसेच भारतातील कृषिक्षेत्राला सेंद्रिय शेतीच्या दिशेने कलाटणी देणारी भेट ठरेल असे परिसरातील मान्यवरांकडून बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER