८ जून रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दिनांक ८ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे याबाबतची अधिकृत घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
उद्या दिनांक ८ जून रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती व त्यांना बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशीर झाल्यामुळे निकाल उशिरा लागणार आहे.
हा निकाल बोर्डाचा संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.#HSC #results@CMOMaharashtra@MahaDGIPR pic.twitter.com/sZm0rCi3fo
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022











