Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

कराड विमानतळ परिघात लावलेले निर्बंध उठवा

खा.श्रीनिवास पाटील : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी
टीम : धैर्य टाईम्स
Lift restrictions on Karad Airport perimeter
कराड विमानतळ परिसरात  लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे केली आहे.

कराड : कराड विमानतळ परिसरात  लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे केली आहे.
खा.श्रीनिवास पाटील हे सध्या दिल्ली येथे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशासाठी उपस्थित आहेत. या दरम्यान त्यांनी कराड विमानतळ संदर्भातील प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांना पत्र लिहले आहे.
खा.पाटील यांनी म्हटले आहे, कराड शहराच्या बाहेर सुमारे 3 ते 4 किमी अंतरावर सदरचे विनापरवाना असलेले छोटे विमानतळ आहे. हे विमानतळ हेलिकॉप्टर आणि लहान खाजगी विमानांसाठी क्वचित प्रसंगी वापरले जाते. त्यानुसार वर्षभरात सुमारे 15 ते 20 विमाने याठिकाणी येत असतात. मात्र विमानतळ आजूबाजूच्या 20 किमी परिसरात बांधकाम आणि वृक्षारोपणावर निर्बंध लादले गेले आहेत. नुकतेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सातारा जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत की, कराड विमानतळापासून 20 किमीच्या परिघात कोणतेही बांधकाम किंवा वृक्षारोपण करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.  
कराड आणि शेजारील मलकापूर शहराच्या पालिका अधिकाऱ्यांना असे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. बांधकामे आणि वृक्षारोपणाची उंची आणि प्रकार याबाबत विशिष्ट आणि स्पष्ट अटींशिवाय या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु असे प्रमाणपत्र मिळवण्याची नेमकी प्रक्रियाही स्पष्ट केलेली नाही. परिणामी या दोन नगरपालिका शहरांमधील सर्व बांधकाम आणि विकास प्रक्रिया   तसेच 20 किमी त्रिज्येच्या मोठ्या क्षेत्रातील संबधित कामे ठप्प झाली आहेत. कराड येथील क्रेडाई संस्था तसेच प्रकल्प बाधित नागरिक या अन्यायकारक आणि अस्पष्ट निर्बंधांबद्दल तक्रारी करत आहेत.
कराड विमानतळ हे छोटेसे विना परवाना असलेले विमानतळ आहे. त्याचा वापर फार कमी वेळा होत असल्याने याची दखल घेऊन एकतर लादलेली निर्बंध उठवण्याची किंवा किमान कोणत्या प्रकारची आणि कोणत्या उंचीपेक्षा जास्त बांधकामांना नाहरकत परवानगी  आवश्यक आहे यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची गरज आहे.
दरम्यान, संपूर्ण परिसराचा विकास ठप्प होऊन मनमानी पद्धतीने लादलेले निर्बंध व त्याच्या अस्पष्ट स्वरूपाबाबत परिसरात तीव्र नाराजी आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व एम.डी. यांच्याकडेही दाद मागितली आहे. मात्र तरीदेखील आपण याची दखल घेऊन तातडीने लक्ष घालावे. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करून याविषयी स्पष्ट निर्देशांसह नागरिकांना योग्य दिलासा देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER