Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या लाकूड व्यवहारात 30 लाखांचा अपहार 

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार : चौकशी करण्याची मागणी
टीम : धैर्य टाईम्स
कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 लाखांचा अपहार झाला असल्याचा आरोप अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडकर आदींनी केला आहे.

सातारा : कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 लाखांचा अपहार झाला असल्याचा आरोप अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडकर आदींनी केला आहे.

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, सातारा येथील संगम माहुली येथील स्मशान भूमीमध्ये सातारा नगरपालिकेच्या वतीने कोवीड 19च्या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींचे गेल्या वर्षापासून आजपर्यंत (मार्च 2020 पासून) अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड पूरवण्याचा ठेका सातारा नगरपालिकेच्या वतीने तेथे जवळच असणार्‍या राजेंद्र कदम या वखार मालकास दिला आहे. एका कोवीडच्या अंत्यसंस्कारासाठी 12 मण (440 किलो) लाकूड व वाहतूक खर्च 200/- रु. अशी पावती वखारीतून नगरपालिकेला मिळत आहे.

सातारा नगरपालिकेला वखार खालीलप्रमाणे एका कोवीड मृत रुग्णासाठी प्रतिमण 300 प्रमाणे 12 मण लाकडपोटी 3600 व लाकूड वाहतूक खर्च 200 असे 3800 रुपयांचे बिल दाखवण्यात येत आहे. प्रत्यक्षात एकाच ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये मृत कोवीड रुग्णांसाठी लागणारे लाकड न वजन करता संपूर्ण ट्रॉली भरून प्रत्येक मृत रुग्णाच्या अग्निकुंडापाशी टाकत आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचे मोजमाप नाही. परंतु, नगरपालिकेला सादर करत असलेल्या बिलामध्ये प्रत्येक मृत कोवीड रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड असा 100 फूट अंतरासाठी वाहतूक खर्च 200 रुपये प्रत्येक मृत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी दाखवत आहेत. हा प्रकार शासनाची आर्थिक फसवणूक करणारा आहे.

प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी केली असता तेथे अंत्यसंस्कार करत असलेल्या अग्णीकुंडात प्रत्यक्षात 7 मण एवढेच लाकूड बसत आहे. त्यापेक्षा जास्त लाकूड आणीकुंडात बसतच नाही. तसेच अत्यंसंस्कारासाठी लागणारे लाकूड बघितले असता, असे दिसून आले की ते रायवळ लाकूड आहे. त्या रायवळ लाकडाचा आजच्या बाजार भावाप्रमाणे दर 250 रुपये प्रती मण इतका आहे. याचाच अर्थ असा की, रायवळ लाकूड 7 मणाप्रमाणे 1750 व 100 फूट अंतरासाठी लाकडाचा वाहतूक खर्च 50  मिळून एकूण 1800 इतका  खर्च येत आहे.

म्हणजेच प्रत्येक मृत कोवीड  रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी 1800 रुपये खर्च होत असताना वखार मालक नगरपालिकेला व तेथील अधिकार्‍यांना हाताशी 2000 रुपये  जास्त दाखवला जात आहे. आजपर्यंत सुमारे 1500 व त्यापेक्षा अधिकच कोवीड मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच तीस लाख एवढ्या रक्कमेचा अपहार झालेला आहे असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.  

कोरोनाच्या भयंकर परिस्थितीतही असा गैरव्यवहार अत्यंत घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. संबंधीत अधिकारी व वखार मालक संगनमत करून राजरोसपणे हा प्रकार करत आहेत. अशा अधिकार्‍यांवर व वखार मालकावर योग्य ती कारवाई करावी. संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: चौकशी करून कागदपत्रांची, बिलांची पाहणी करून, वजन न करता लाकडाची वाहतूक करणार्‍या व संपूर्ण गैरकारभार करणार्‍या पालिकेच्या अधिकार्‍यांना निलंबीत करावे आणि अपहार झालेल्या रकमेची वसूली करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER