Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

समाजसेवेचे दीपस्तंभ बापूसाहेब तुकाराम तथा बी.टी. जगताप

टीम : धैर्य टाईम्स

फलटण तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील समाजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे बापूसाहेब तुकाराम उर्फ बी.टी. जगताप. आज त्यांचा 61 वा वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा घेतलेला आढावा. सामाजिक बांधिलकी, विचारप्रवर्तक कार्य आणि जनहिताची अखंड धडपड या सर्व गोष्टींचा मागोवा घेण्याची ही योग्य वेळ आहे. चार दशकांपासून शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेवर आधारित सामाजिक कार्य करत, त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी न्याय, शिक्षण आणि समानतेचा आवाज बुलंद केला आहे.


1992 साली स्थापन झालेल्या प्राथमिक आश्रम शाळा, निंभोरेचे ते सचिव असून, शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक वंचित मुलांच्या आयुष्याला दिशा दिली. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा प्रमुख मार्ग आहे, हे तत्व त्यांनी आचरणात उतरवले आहे.


1995 पासून ते सातारा जिल्हा दलित सेनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांनी समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न शासनदरबारी मांडले. याच काळात माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रेल्वे आणि दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार समित्यांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.


2004 पासून छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली, जी आज एक सामाजिक चळवळ बनली आहे. विद्यार्थीवर्गावरही त्यांचा विशेष ओढा असून, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांनी अनेकांना शिक्षणात टिकून राहण्यास मदत केली.


2009 साली आयोजित सामूहिक विवाह सोहळा हा त्यांच्या सामाजिक कार्यातील एक मैलाचा दगड ठरला. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा देणारी ही उपक्रमशीलता त्यांची ओळख बनली. कोविड काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता कार्य केले आणि “कोविड योद्धा” म्हणून अनेक डॉक्टर्सना गौरवांकित केले आहे. 


त्यांच्या निःस्वार्थ कार्याची दखल घेत, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर चारिटेबल ट्रस्ट, धाराशिव यांच्या वतीने “जगद्गुरु संत तुकाराम महाराज पर्यावरण पुरस्कार – 2025” ने त्यांना गौरविण्यात आले. तसेच मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, दीक्षा चारिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना “राजश्री शाहू सामाजिक सन्मान पुरस्कार – 2025” ने सन्मानित करण्यात आले.


बापूसाहेब जगताप यांचे कार्य हे केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक परिवर्तनाच्या मातीतील उगवलेले तेजस्वी फूल आहेत. त्यांचे आयुष्य ही एक प्रेरणादायी कहाणी आहे विचार, कृती आणि सेवाभाव यांची.


आज त्यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त सर्व समाजबांधवांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा —

“दीर्घायुषी व्हा, निरोगी राहा आणि समाजसेवेची ही वाट अधिक तेजोमय करा


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER