Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

पाटण तालुक्यात कुणबीदाखले वितरणाची मोहीम होणार वेगवान

23 जानेवारी पासून प्रत्यक्ष मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे काम सुरू होणार
टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 23 प्रतिनिधी 

सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरागे पाटील मोठ्या संख्येने मराठा बांधवासह मुंबईच्या दिशेने जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील समजायचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला असून संपूर्ण राज्यात 23 जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू होत आहे. पाटण तालुक्यात देखील या सर्वेक्षणाची पूर्वतयारी करण्यात आलेली असून प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले. पाटण तालुक्यात 453 प्रगणक व 32 पर्यवेक्षक यांची या कामाकरीता नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.

पाटण तालुक्यात मागील महिन्यात कुणबी नोंदीची शोधमोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात आली असून त्यानुसार पाटणमधील सुमारे 200 गावांमध्ये एकूण 38736 कुणबी संदर्भात नोंदी आढळून आल्या आहेत . या सर्व मराठी भाषेतील नोंदी असून मोडी भाषेतील नोंदी वाचनाचे काम लवकरच सुरू होणार आहे . कुणबी नोंदी संदर्भातील आकडा आणखी वाढणार आहे.

या नोंदीच्या पार्श्वभूमीवर पाटण महसूल विभागाने यापूर्वीच कुणबी दाखल्याचे वितरण सुरू केले आहे . आतापर्यंत सुमारे 800 कुणबी दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी ह्या पाटण तालुक्यात असून दाखले वितरणाचे प्रमाण देखील पाटण तालुक्यात सर्वाधिक असल्याने पाटण मधील सकल मराठा समाजाने समाधान व्यक्त केले आहे . मनुष्य बळाची कमतरता असली तरी सुट्टीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेनंतर रात्री उशिरा पर्यंत कार्यालयात थांबून ही मोहीम अधिक वेगवान करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.

 कुणबी नोंदीच्या दाखल्याची वितरणाची मोहीम अधिक सुटसुटीत व वेगवान करण्यासाठी प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी रविवार सुट्टीचा दिवस असताना देखील सेतू कार्यालयात व तहसील कार्यालयात भेट देऊन प्रलंबित दाखल्याचे वितरण तत्परतेने होण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या. जागेवरच सुमारे 23 कुणबी दाखले ऑनलाईन पद्धतीने निर्गमित केले आहेत.

इतकेच नाही तर प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी डिगेवाडी (अडुळ) व लुगडेवाडी येथील 5 कुणबी दाखल्याचे थेट घरपोहच वितरण करून संबंधित अर्जदार याना सुखद धक्का दिला आहे. यापुढे कुणबी दाखले वितरणाची मोहीम अधिक वेगवान करणार असून जास्तीत जास्त मराठा बांधवांना पुराव्याचे कागदपत्र सादर केलेनंतर तत्काळ दाखले वितरण करण्यात येईल, असे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी नमूद केले आहे.

तसेच शासनाच्या निर्देशानुसार 23 जानेवारी पासून पाटण तालुक्यात जे प्रगणक मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी येणार आहेत त्यांना सर्व मराठा बांधवांनी माहिती देऊन सहकार्य करावे असेही आवाहन सुनील गाढे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER