फलटण प्रतिनिधी : फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध चर्चा रंगत असताना निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक पुढे ढकलण्याबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांना उत्तर देताना निवडणूक विभागाने जाहीर केले की, "निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याबाबत किंवा पुढे ढकलण्याबाबत अद्याप पर्यंत मा. राज्य निवडणूक आयोगाचे कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्यास तात्काळ अवगत करण्यात येईल."
फलटण शहरात उमेदवारांची धावपळ, प्रचाराची रंगत आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता पाहता निवडणूक वेळेतच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अधिकृत आदेश येईपर्यंत निवडणूक कार्यक्रम पूर्ववत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाचा स्पष्ट संदेश आहे. फलटण मध्ये आता सर्वांच्या नजरा आयोगाच्या पुढील निर्णयावर
आगामी अपडेटसाठी लक्ष ठेवा…











