Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा खून

गुन्हा 2 तासाच्या आत उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
टीम : धैर्य टाईम्स
Murder of a 5-year-old boy with intent to commit an unnatural act
म्हसवे, ता. सातारा येथील एका घरात अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली. या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तासात केली असून या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.

सातारा : म्हसवे, ता. सातारा येथील एका घरात अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली. या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तासात केली असून या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.7 रोजी सायंकाळी 6.00 ते 7.30 वा.च्या सुमारास म्हसवे, ता.जि.सातारा या गावातील एका घरामध्ये 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणाकरीता खुन केला म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली. 5 वर्षाच्या मुलाचा कोणीतरी अज्ञात इसमाने खून केला, ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याने पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.
किशोर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले. या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल विचारपूस करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना.गणेश कापरे, मोहन पवार, पो.कॉ.रोहित निकम, वैभव सावंत यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली की, घटनास्थळ असलेल्या घराशेजारील एका विधी संघर्षग्रस्त बालकाने मयत अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचे उद्देशाने घटनास्थळावर घेवून जावून त्याचा खून केला आहे. अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर गणेश वाघ व त्यांच्या तपास पथकाने गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालकास तात्काळ ताब्यात घेवून त्याच्याकडे कौशल्यपुर्ण पद्धतीचा वापर करुन विचारपूस केली असता त्याने त्या बालकाचा खून अनैसर्गिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने केला असल्याचे सांगितले. अशारितीने 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या खुनाचा गुन्हा 2 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या सूचनांप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदससिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो.ना. मुनीर मुल्ला, गणेश कापरे, मोहन पवार, पो.कॉ. रोहित निकम, वैभव सावंत, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, अमित पाटील, पो.हवा.दादा परिहार, पो.ना.नितीराज थोरात, मालोजी चव्हाण, सतिश पवार यांनी केली आहे.

मुलांच्या हातात मोबाईल देताय सावधान!
या खुनाच्या घटनेत समोर आलेले कारण पाहता छोट्या मुलाबरोबर अनैसर्गिक कृत्य करण्याचा भावना निर्माण होण्यासाठी मुलांच्या हातात गेलेले मोबाईल कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. मुलांना मोबाईल देताना ते काय पहात आहेत, नेमके मोबाईलवर काय करत आहेत याकडे आता पालकांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. कारण अल्पवयात ही मुले पॉर्न पहात असल्याने त्यांच्या मनावर त्याचे विपरित परिणाम होत आहेत. त्यातूनच मग अशा प्रकारचे कृत्य करण्याची भावना त्यांच्यात अल्पवयातच निर्माण होते. त्यातून मग विकृती निर्माण होवून अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे समोर येत आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER