Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

खटाव-माण ऍग्रो मुळे शेती व्यवसायात क्रांती

रस्त्यांचा विकास व रोजगार निर्मिती; युवकांच्या हाताला काम मिळाले
टीम : धैर्य टाईम्स
Revolution in the agribusiness due to Khatav-Maan Agro
पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.

मारुती पवार
मायणी : पडळ, ता. खटाव येथील माळरानावर माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षांपूर्वी उभा केलेला. खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे शेती, पाणी व सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने लक्ष मार्गी लावला. खटावसह माण तालुक्यातील शेती व्यवसायात क्रांती निर्माण झाली आहे. परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध झालाच आहे. शिवाय कारखाना परिसरामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्यामुळे वाहतूक व दळणवळण प्रश्न मार्गी लागला आहे.
खटाव माण तालुक्यातील शेतकर्‍यांना हक्काचा साखर कारखाना असावा यासाठी सातारा जिल्हा बँकेचे संचालक व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी तीन वर्षापूर्वी संकल्प केला. खटाव-माण तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये टँकर घ्यावा लागतो. अशा दुष्काळी भागात साखर कारखाना उभा करणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच होते.
या भागातील शेतकर्‍यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी औद्योगिक प्रकल्प निर्माण होणे गरजेचे होते. औद्योगिक प्रकल्प निर्माण झाल्याशिवाय औद्योगिक क्रांती होणार नाही. यासाठी सहकार्‍यांच्या मदतीने खटाव-माण ऍग्रो प्रोसेसिंग कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.सन 2019 साली पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू केला. पहिला चाचणी गळीत हंगाम सुरू करताना अनेक अडचणी समोर आल्या यातून मार्ग काढण्यासाठी नियोजन केले.
सुरुवातीला उपलब्ध पाण्यावर ऊस शेती करत असलेले शेतकरी ऊस नोंदणी पासून ते ऊस तोडणीचे असंख्य प्रश्न समोर उभे असायचे ,म्हणून प्रथम कारखाना उभा केला. या भागातील शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लावताना तालुक्याच्या हक्काच्या असलेल्या उरमोडी, जिहे-कठापूर ,टेंभू ,तारळी या उपसा सिंचन योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून यातून रखडलेल्या योजना मार्गी लावल्या. आज खटाव -माण या दोन्ही तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाताना दिसत आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे ऊस शेती क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली. आज एक दोन साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालतील एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र तयार झाले आहे.
खटाव-माण ऍग्रो कारखान्यामुळे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. तसेच या परिसरात असलेली मायणी,कातरखटाव, पडळ यासह धोंडेवाडी पळसगाव या गावामधील बाजारपेठेचा विस्तार वाढू लागला. अनेक युवकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंच होण्यास सुरवात झाली आहे. तर कारखान्याच्या माध्यमातून हजारो लोकांना नोकरी मिळाली आहे. साखर कारखान्या बरोबरच इथेनॉल, डिस्टलरी प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. येत्या एक-दोन वर्षात हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील त्यामुळे एक औद्योगिक क्रांतीचा पायाच हा खटाव माण  ऍग्रो साखर कारखाना होत आहे.
प्रभाकर घार्गे व मनोजदादा घोरपडे यांच्या दृष्टीतून उभा राहिलेल्या या साखर कारखान्यामुळे परिसरातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. कातरखटाव वरून कलेढोणकडे जाणारा एकेरी मार्गाचे राज्य मार्गात रूपांतर करून हा एक चांगल्या दर्जाचा प्रमुख मार्ग निर्माण करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे.  धोंडेवाडी गावापासून दगडवाडी चौक ते कारखान्यापर्यंत व  मायणी माळीनगर, दगडवाडी, दातेवाडी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर मायणी-अनफळे मार्गे पडळकडे जाणार्‍या मार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे या भागाचा दळणवळणाचा प्रश्नही या कारखान्यामुळे मार्गी लागला आहे.
कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोज दादा घोरपडे यांच्या दूरदृष्टीतून अनेक अडचणींवर मात करून उभा राहिलेल्या खटाव माण ऍग्रो  प्रोसेसिंग लिमिटेड या साखर कारखान्यामुळे खटाव माण तालुक्याच्या औद्योगिक विकासास चालना मिळाली आहे. अल्पावधीतच महाराष्ट्रातील अग्रगण्य कारखान्यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिळालेल्या या कारखान्याच्या तृतीय गळीत हंगामास हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER