महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विडणी (ता. फलटण जि. सातारा ) या विद्यालयामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व विद्यार्थ्यांचा दिंडीचा सोहळा गुरुवार दिनांक 30 जून 2022 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेमध्ये विडणी गावठाण येथे आयोजित केला आहे. सकाळी 8 ते 10 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व 10 ते 11 ह. भ. प. योगेश महाराज नाळे यांचे विद्यार्थ्यांवरील संस्कार व आई-वडिलांची सेवाविषयावरील प्रवचन होणार आहे. यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे, चेअरमन श्रीराम सहकारी साखर कारखाना, सौ. रुपालीताई संजय अभंग सरपंच विडणी, पंचायत समिती सदस्या सुशीला मारुती नाळे, तसेच महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव व सर्व सन्मानित सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी विडणी गावातील सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी आपल्या बालगोपाळांचा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्रशाळेच्या वतीने करण्यात आले आहे.



















