Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

टीम : धैर्य टाईम्स

सातारा दि. 27  :   सालाबादप्रमाणे  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
            पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. रविवार दि. 7 जुलै रोजी लोणंद येथे दिवसभर व रात्रीचा मुक्काम असेल तर सोमवार दि. 8 जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन दुपारी लोणंद येथून निघून दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल तर मुक्काम तरडगांव येथे होणार आहे.
            मंगळवार दि. 9 जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून प्रस्थान होईल. सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा, दुपारचा विसावा वडजल व फलटण दूध डेअरी, रात्रीचा मुक्काम फलटण (विमानतळ).
            बुधवार दि. 10 जुलै रोजी सकाळी फलटण येथून प्रस्थान, सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, दुपारचा विसावा निंबळक फाटा, रात्रीचा मुक्काम बरड येथे असेल.
            गुरुवार दि. 11 जुलै रोजी बरड येथून प्रस्थान, सकाळचा विसावा साधबुवाचा ओढ, दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ, दुपारचा विसावा शिंगणापूर फाटा (पानसकर वाडी) येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश व रात्रीचा मुक्काम नातेपुते(जि. सोलापूर).
  प्रशासनातर्फे पुढीलप्रमाणे कार्यवाही केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन व स्वागत करणे कामी मौजे पाडेगांव येथे जय दुर्गा मंगल कार्यालयाचे समोर स्वागत मंडप उभारण्याचे काम व सातारा जिल्ह्यातील सर्व मान्यवर व प्रशासकीय अधिकारी यांची बसण्याची व्यवस्था करणेची कार्यवाही सुरु आहे. पालखी विसावा, पालखी तळावरील झाडे झुडपे काढणेबाबत संबंधित यंत्रणांना कार्यवाही सुरु आहे. पालखी महामार्गावरील खडडे, साईडपटटया तसेच पालखी तळावर मुरुम/खच टाकून रोलिंग करावयाचे कामकाज सुरु आहे. पालखी विसावा चवुत-याचे स्ट्रक्चरल ऑडीट तसेच पालखी विसावा व पालखी तळाकडे जाणारे अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवणेचे काम जिल्हा परिषद बांधकाम कडून करणेत आले आहे.  शौचालय उभारणी ठिकाण व संख्या तसेच मैला गाळ व्यवस्थापन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
  सातारा जिल्हयामध्ये पालखीचे लोणंद, तरडगांव, फलटण व बरड येथे एकूण ५ मुक्काम आहेत. पालखी सोबत असणारे वारकरी यांचा विचार करुन फिरते शौचालयाचे नियोजन खालीलप्रमाणे केलेले आहे.
लोणंद - १३ ठिकाणी १८०० फिरते शौचालय, तरडगांव -१७ ठिकाणी १८०० फिरते शौचालय, फलटण- १३ ठिकाणी १८०० फिरते शौचालय,  बरड - २१ ठिकाणी १८०० फिरते शौचालय तसेच पालखी महामार्गावर ३७ ठिकाणे निश्चित करुन ७४ तात्पुरती मुतारी उभारणेत आलेल्या आहेत. पालखी मार्गावर १२ ठिकाणे निश्चित करुन २४ बंदीस्त महिला स्नानगृहाची व्यवस्था करणेत आलेली आहे. पालखी महामार्गावरील पाडेगांव, तरडगांव, बरड, विडणी, कापडगांव, कोरेगांव, सुरवडी, राजुरी, निंभोरे, पिंपरद, निंबळक, वडजल, काळज, जाधववाडी (फलटण) आणि कोळकी येथे प्रत्येकी १ या प्रमाणे १५ तात्पुरते निवारा शेड उभारणी करण्यात आली आहेत.

सेवेचे संनियंत्रण करिता अधिकारी व कर्मचारी नियुक्ती (ठिकाण निहाय) आदेश काढणेचे कामकाज संबंधित विभागाकडून सुरु आहे. पाण्याचे स्त्रोत व पाण्याचे टँकर भरण्याचे ठिकाणे निश्चित करणेत आली आहेत.
३२२- विहीरी, ७४- बोअरवेल, ९- सार्वजनिक पाणी टाकी अशा एकूण ४०५ ठिकाणाहून वारीसाठी पाणी पुरवठा करणेत येणार असून ३४५० टँकर भरणेची क्षमता असून २१५ टँकरव्दारे पाणी पुरवठा करणेत येणार आहे.
  आरोग्य व्यवस्था - आरोग्य व्यवस्थेसाठी ६४ वैद्यकिय अधिकारी, ५३६ आरोग्य कर्मचारी, ३९ रुग्णवाहिका, १७ आरोग्य दूत, १ ग्रामीण रुग्णालय, ३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २१ आपला दवाखाना स्थिर वैदयकिय पथके नियुक्त करणेत आलेली आहेत. तसेच पालखी मार्गालगतचे खाजगी हॉस्पिटलमध्ये १० टक्के खाटा आरक्षित ठेवणेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेमार्फत कार्यवाही सुरु आहे.  आषाढी वारी कालावधीत महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने - हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन सुविधा, निवारा गृहे, पिण्याचे पाण्याची सुविधा, निवास सुविधा, महिला मदत व मार्गदर्शन कक्षाची उभारणी करणेत आलेली आहे.  पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार, दारु दुकाने बंद ठेवणेचे आदेश काढणेत आलेले आहेत. परिवहन विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणा-या वाहनांची सुरक्षा विषयक तपासणीचे आदेश काढणेत आलेले आहेत. खाद्यगृह, खाद्यपदार्थ, शितपेय यांची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी आदेश काढणेत आलेले आहेत. पालखी मार्गावर पालखी मार्गक्रमण कालावधीत ठराविक मार्गावरील वाहतुक बंद ठेवणेबाबत आदेश काढणेत आलेले आहेत. लोणंद मुक्कामी ५ गॅस एजन्सीमार्फत ७००० गॅस सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था करणेत आलेली आहे. तरडगांव, फलटण व बरड मुक्कामी १० गॅस एजन्सीमार्फत १२००० गॅस सिलेंडर रिफिल करण्याची व्यवस्था करणेत आलेली आहे.  गृह विभागाकडून पालखी कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होउ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त नेमणेत आलेला आहे.
महसूल विभाग, स्वच्छता विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, आणि गृह विभाग या विभागातील सर्व मिळून एकूण 3 हजार 132 अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER