फलटण प्रतिनिधी :
फलटण नगरपालिका निवडणुकीत आज राजकीय घडामोडींचा मोठा उलटफेर झाला आहे. माजी नगरसेवक असिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, रफीकभाई मेटकरी, इकबाल मेटकरी, हाजी सादीकभाई मेटकरी, मजहर मेटकरी व असलम मेटकरी यांनी देखील अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश जाहीर केला. तर नगराध्यक्ष पदाचे इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलेले प्रशांत अहिवळे यांनी आपला अर्ज अधिकृतरीत्या माघारी घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी यावेळी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील
तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, युवा नेतृत्व रणजित भोसले, माजी नगरसेवक अनुप शहा, धनंजय साळुंखे-पाटील, जयकुमार शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला आता आणखी बळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा व राष्ट्रवादीत आनंदाचे वातावरण तर राजे गटामध्ये चिंता वाढल्याचे चित्र आहे.
निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर हे घडामोडी फलटणच्या राजकारणात नवे समीकरण उभे करू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.











