Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण

आडमुठ्या धोरणाचे अधिकारी यांच्या हस्तक्षेपा मुळे सदानंद मोरे यांचा राजीनामा ; त्यांचेवर तातडीने प्रशासकीय कारवाई करावी

टीम : धैर्य टाईम्स

पुणे : ‘‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातील काही सचिव, अवरसचिव दर्जाच्या आडमुठ्या धोरणाचे अधिकारी नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ या स्वायत्त मंडळाच्या कारभारात अतिशहाणपणाने अन्यायी हस्तक्षेप करीत आहेत. त्यांच्या या अनाठायी हस्तक्षेपाचा निषेध म्हणून मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशा अधिकार्‍यांच्या हस्तक्षेपामुळे मंडळाच्या अध्यक्षांवर राजीनामा देण्याची वेळ येणे म्हणजे एका अर्थाने स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा अपमान आहे. त्यामुळे अशा अधिकार्‍यांची शासनाने चौकशी करुन त्यांचेवर तातडीने प्रशासकीय कारवाई करावी’’, अशी मागणी या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्‍वस्त विनोद कुलकर्णी (सातारा) यांचेसह सातारा जिल्ह्यातील अनेक साहित्यिक व यशवंतराव चव्हाण प्रेमी नागरिक, विचारवंतांनी केली आहे.

‘‘स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील मराठी भाषा साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने या साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. या स्वायत्त मंडळाच्या काराभारात शासनातील सचिव व अवर सचिव अधिकारी अतिशहाणपणाने अन्यायी हस्तक्षेप करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजितदादा पवार यांनीही या प्रकरणाची तातडीने दखल घेवून मराठी भाषा मंत्री ना.दीपक केसरकर यांना सांगून डॉ.सदानंद मोरे यांची प्रशासनाच्यावतीने माफी मागून त्यांचा राजीनामा नामंजूर करावा व राज्याच्या वाड्मयीन संस्कृतीवरील हा प्रशासकीय कलंक पुसून टाकावा’’, अशीही मागणी बेडकिहाळ व कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

‘‘उठसूठ एकमेकांची राजकीय उणीधुणी काढून दररोज उखाळ्या पाखाळ्या काढणार्‍या राज्यातील एकाही विरोधी पक्षानेदेखील मराठी भाषा अस्मितेच्या या प्रकाराबद्दल अद्याप काही दखल घेतली नाही. या पक्षांच्या वैचारिक दिवाळखोरीचेही आश्‍चर्य वाटत असल्याचे नमूद करुन राजकारण बाजूला ठेवून सर्वच विरोधी पक्षांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराने स्थापन झालेल्या या वाड्मयीन मंडळाला पाठींबा द्यावा’’, अशी अपेक्षाही बेडकिहाळ यांनी व्यक्त केली आहे.

‘‘वास्तविक पाहता या मंडळाच्या कारभारातील आर्थिक तरतुदी वाढवायची शिफारस मंडळाने अनेक वेळा शासनाकडे केली आहे. मंडळाचे अध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी व त्यांचे सहकारी व या मंडळातील सर्व कर्मचारी तुटपुंज्या आर्थिक तरतुदीतसुद्धा अनेक वाड्मयीन प्रकल्प पूर्ण करीत आहेत. अधिक माहिती घेतली असता मंडळाच्या अध्यक्षांना फक्त रु.10 हजार मानधन मिळते असे समजते. हे राज्याच्या मराठी भाषा विकासामधील एक आश्‍चर्यच आहे’’, असे नमूद करुन; ‘‘राज्यशासनाच्या अशा सर्वच मंडळांच्या अध्यक्षांना म्हणजे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्‍वकोष मंडळ, मराठी भाषा सल्लागार समिती, शाहू, फुले, आंबेडकर चरित्र समिती, लोकसाहित्य समिती आदी सर्वच मंडळ / समिती अध्यक्षांना राज्यशासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन त्यांचे मानधन, प्रवास व्यवस्थेसाठी स्वतंत्र वाहन, मदतनीस, सुरक्षा व्यवस्था, निवास इत्यादी व्यवस्थांबद्दल तातडीने निर्णय घ्यावा, सर्वच वाड्मयीन मंडळांना स्वायत्त आर्थिक अधिकार व दर्जा द्यावा, मंडळ / समिती यांचे नावे बालीशपणाने बदलू नयेत यासाठी राज्यातील सर्वच साहित्यप्रेमी नागरिक, साहित्यिक, साहित्य संस्था यांनी झाल्या प्रकाराचा निषेध करुन राज्याची वाड्मयीन एकजूट दाखवावी’’, असेही आवाहन रविंद्र बेडकिहाळ व विनोद कुलकर्णी यांनी केले आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER