फलटण प्रतिनिधी :
शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारा संवाद वारी उपक्रम फलटण शहरात दाखल झाला आहे. उद्या दि. ९ रोजी दिवसभर हा उपक्रम फलटण शहरात सुरू राहणार आहे.
शहरात प्रांत अधिकारी कार्यालयाच्या आवारात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. तर शहराच्या विविध भागात विशेषतः पालखी तळ व आजूबाजूच्या परिसरात चित्ररथ, पथनाट्य, लोककला आणि एल इ डी वाहनाच्या माध्यमातून योजनांविषयी माहिती नागरिक व वारकरी यांना घेता येणार आहे.
शासनाच्या विविध योजना आणि जन कल्याणकारी निर्णयांची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने संवाद वारी उपक्रम राबवण्यात येत आहे.











