Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

मनसेच्या सातारा जिल्हा संपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी घेतला मनसेचा झेंडा खांद्यावर, केला पक्षप्रवेश
टीम : धैर्य टाईम्स
Inauguration of MNS Satara District Liaison Office in mind
सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सहकार सेना राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरुन आलेल्या विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार होते.

सातारा : सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सहकार सेना राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरुन आलेल्या विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार होते.
यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, पुणे जिल्हाध्यक्ष समीर थीगळे, पुणे जिल्हाध्यक्ष रविंद्र गारुडकर, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष मितेश खाडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल शेडगे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार फाळके, सातारचे जिल्हा सचिव अश्विन गोळ, विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रोशन भोसले, शहर अध्यक्ष राहुल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गावपातळीवरच नव्हे तर वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम मनसैनिक करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल स्वत: पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे घेत असतात. सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी युवराज पवार यांनी लिलया पेलली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. गावांबरोबरच डोंगरी भागातील समस्या सोडविण्यासाठी मनसे बांधील आहे. डोंगरी भागातील ग्रामस्थांच्या अनुदानाचा प्रश्‍न आम्ही नक्कीच सोडवू.
युवराज पवार म्हणाले, सातार्‍यातील प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातार्‍यात आपले वलय निर्माण केले आहे. त्यामुळेच मनसे पदाधिकार्‍यांकडे प्रलंबित प्रश्‍न घेवून जिल्ह्यातील आया-बहिणी व समस्त नागरिक थेट भेटतात. त्यांना भेटण्यास सुकर व्हावे यासाठी या संपर्क कार्यालयाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारा मी कार्यकर्ता आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसंदर्भात रस्त्यावर उतरुन आंदोलने करावी लागली तरी मागे हटणार नाही. मात्र माझ्या जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न मी सोडवणारच. पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी मनसे सातारा जिल्ह्यात पुढे घेवून जाण्यामध्ये मी कधीच कसूर केली नाही वा करणारही नाही.
या कार्यक्रमात शेकडो विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी डोंगरी परिषद संदर्भात मनसेच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्षांची बैठकही घेण्यात आली. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध ठिकाणावरुन आलेले मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER