Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

खिंडवाडीतील खुनाच्या मागे नरबळीचा संशय

पोलिसांनी कसून चौकशी करण्याची अंनिस मागणी
टीम : धैर्य टाईम्स
Suspicion of manslaughter behind the murder in Khindwadi
खिंडवाडी येथे १७ नोव्हेंबर तारखेला झालेला अमोल डोंगरे ह्या तरुणाचा खून हा नरबळी असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. त्या आधारे पोलिसांनी ह्या घटने मध्ये नरबळीच्या शक्यतेचा कसून तपास करावा आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, असे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाला डॉ हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, हौसेराव धुमाळ, वंदना माने, शंकर कणसे यांनी म.अंनिस मार्फत दिले आहे.

सातारा : खिंडवाडी येथे १७ नोव्हेंबर तारखेला झालेला अमोल डोंगरे ह्या तरुणाचा खून हा नरबळी असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. त्या आधारे पोलिसांनी ह्या घटने मध्ये नरबळीच्या शक्यतेचा कसून तपास करावा आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, असे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाला डॉ हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, हौसेराव धुमाळ, वंदना माने, शंकर कणसे यांनी म.अंनिस मार्फत दिले आहे.
अमोल डोंगरे यांचे बंधू भागवत डोंगरे राहणार कोठरबन तालुका वडवणी जिल्हा बीड यांनी अनिसला संपर्क करून दिलेल्या तक्रार अर्जाच्या नुसार मंअनिस कार्यकर्त्यांनी ह्या विषयी सखोल चौकशी केली असता असे समोर आले आहे कि मधुकर सोनावणे हा खून प्रकरणात सापडलेला आरोपी स्वत: मांत्रिक म्हणून कोठरबन ता.वडवणी जि. बीड येथेकार्यरत होता. त्याच्या कडे दैवी शक्ती असून तो तंत्र मंत्र विद्या जाणतो असे तो म्हणत असे आणि लोकांना भूत उतरवणे , खजिना शोधणे अशा गोष्टींच्या साठी मदत करण्याचे दावे करून फसवत असे अशी माहिती समोर आली आहे. मुळचे बीड कोठरबनचे रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जावळे आणि श्री केशव वाघमारे ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार संशयित आरोपी मधुकर सोनावणे हा त्या गावात गेले काही महिने समुद्रातील सोने काढून देतो असे सांगून लोकांची फसवणूक करीत होत आणि त्या योगे एखाद्या व्यक्तीला मोहात पडून त्याला बळी देण्याचे त्याचे मनसुबे होते. असा संशय गावात व्यक्त केला जात आहे.
अशी कोणती व्यक्ती सहजी न भेटल्यामुळे अमोल डोंगरे ह्याचे ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सहकारी सुनील रखमाजी डोंगरे ह्यांना सोबत घेवून मनोहर सोनावणे ह्यांनी अमोल डोंगरे ह्याच्या खुनाचे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात देखील त्यांनी ह्याची वाच्यता केली आहे. तसेच अमोल डोंगरे ह्याचा खून केल्याने आपण आता अमर झालो. अमोल डोंगरे माझ्या राशीला आला होता म्हणून त्याला ठार मारले अशी विधाने संशयित आरोपीकडून केली गेली आहेत. तसेच खुनाच्या नंतर अमोल डोंगरे ह्यांच्या मृत देहाच्या पायाला बिबा बांधून त्याला लिंब खिंडी जवळच्या खाणीत टाकण्यात आले होते. ह्या पार्श्वभूमीवर अमोल डोंगरे खून प्रकरणात नरबळीच्या शक्यतेचा विचार करून पोलीस दलाने कसून चौकशी करावी आणि संशयित आरोपीना जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे देखील लावावीत अशी मागणी म. अंनिस मार्फत करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अजून देखील मोठ्या प्रमाणात अघोरी विद्या, करणी राशीला येणे ह्या सर्व मानवी मनाच्या कल्पना मानणारे लोक असून त्या मधून अशा भोंदू बाबा बुवांचे फावते आणि त्या मधून नरबळी सारख्या मानवी संकृतीला काळिमा फासणाऱ्या घटना अजून देखील घडत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेणे आवश्यक असून अनेक वर्ष प्रलंबित असलेले जादूटोणा विरोधी कायद्यातील नियम तातडीने तयार करणे आणि दक्षता अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे. मंत्र-तंत्र करणे करणी राशीला येणे ह्या सर्व मानवी कल्पना असून प्रत्यक्षात असे काही नसते. आपल्या आयुष्यामध्ये चांगले किंवा वाईट घडण्यामध्ये याचा काहीही वाटा नसतो. ह्या विषयी समाजात अजून मोठ्या प्रमाणत प्रबोधन करण्याची गरज ह्या घटने मुळे अधोरेखील होत आहे आणि ह्या विषयी म.अंनिस प्रबोधन मोहीम राबवेल, असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER